रायगड जिल्ह्यातील गणेशोत्सव २०१९ साठी करावयाच्या उपाययोजना तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी परिषद सभागृह,६ वा मजला, विस्तारित इमारत, मंत्रालय, मुंबई येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, पोलीस अधिक्षक रायगड जिल्हा, अनिल पारसकर, तसेच शासनाच्या सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील!
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातर्फे महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग पालघर ह्यांना भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्त्य साधून जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी अद्ययावत रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. उपस्थित मान्यवरांसमवेत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करताना.
पालघर जिल्हातील जव्हार येथील पतंगशहा कुटीर रुग्णालय येथे डॉक्टर अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचा उद्घाटन समारंभ पार पडला. या प्रसंगी मान्यवर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
पालघर जिल्हा दौऱ्या दरम्यान तलासरी येथे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कार्यकर्त्यांनी करताना.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जांभरूण येथे भारतीय जनता पक्षाचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
उरण येथील भारतीय जनता पक्ष सदस्यांनी पी.पी. खारपाटील हायस्कूल चिरनेर येथे पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात चिरनेर पंचक्रोशीतील विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!
रायगड जिल्ह्यातील उरण येथील चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील चिरनेर गाव स्मशानभूमी ते खाडी, नाला खोदाई व बांध बंदीस्त या कामकाजाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी आमदार प्रशांतजी ठाकूर, आमदार मनोहर भोईर, महेशजी बालदी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे अधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
आगरी यूथ फोरम, डोंबिवली यांनी विद्यार्थी व गुणवंताचा गौरव सोहळा डोंबिवली येथे आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाकरीता मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची माहिती दिली. प्रसंगी ज्येष्ठ नेते मा. श्री. जगन्नाथजी पाटील, श्री. रमेशजी पाटील, श्री. गुलाबाजी वझे, विद्यार्थी, पालक व इतर मान्यवर उपस्थित होते.
महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही प्रलंबित कामांचा परिणाम नागरिकांना सोसावा लागत असून यामुळे शासनाबद्दलची चुकीची प्रतिभा सर्वसामान्यांमध्ये पोहोचत आहे. पालघर जिल्ह्य़ात पुरेशा प्रमाणात रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) ठेवण्यात यावेत तसेच बिघाड झाल्यास दोन दिवसांमध्ये ट्रान्सफॉर्मर बदलण्याची व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश महावितरणच्या मुख्य अभियंता यांना देण्यात आले.