पालघर जिल्हा वर्धापनदिन व महसुलदिन समारंभ पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. वर्धापनदिन व महसुलदिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
गोपाळकाला म्हणजे चैतन्याचा उत्सव! याच गोपाळकाला सणासाठी डोंबिवली पश्चिम येथील नवसह्याद्री गोविंदा पथकाचा दहीहंडीचा सराव आजपासून सुरू करण्यात आला. त्याप्रसंगी पूजेस उपस्थित राहून सर्व गोविंदाना सुरक्षितपणे सराव करून दहीहंडी उत्सव साजरा करण्यास शुभेच्छा दिल्या.
शिवाई बालक मंदिर ट्रस्ट आयोजित कल्याण तालुका शिवाई आंतरशालेय वर्षां मॅरेथॉन 2019 डोंबिवली येथील सावळाराम क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली होती. प्रसंगी खेळाडू व इतर मान्यवर उपस्थित होते. गतिमंद आणि दिव्यांग मुलांचा सहभाग हे या मॅरेथॉनचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. सर्व सहभागी स्पर्धक व आयोजक संस्था आणि पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! मुलांना खेळांचे महत्त्व पटवून […]
महाराष्ट्र शासन पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद पालघर आयोजित संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१८-२०१९ आणि जिल्हा परिषद गट स्पर्धा व जिल्हास्तरीय राष्ट्रसंत तुकोडजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा चे बक्षीस वितरण समारंभ व स्वच्छ महोत्सव उदघाटन सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला. स्वच्छता अभियानाचा प्रचार व प्रसार व्हावा स्वच्छतेचे फायदे याबाबत माहिती दिली.पुरस्कार प्राप्त करण्याऱ्या गटाचे […]
पालघर जिल्ह्याच्या नवीन प्रशाकीय इमारतीच्या बांधकामाबाबत बैठक पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी श्री कैलास शिंदे सिडकोचे अधिकारी, शासनाचे विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. इमारतीचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे व वेळेत पूर्ण होण्यासाठी आदेश दिले.
श्री विठु माऊली चॅरिटेबल ट्रस्ट बाल संजीवन छावणीचे उद्घाटन माननीय सौ.अमृता फडणवीस यांचे हस्ते करण्यात आले. या छावणीत गरोदर माता, शिशु, यांचे पोषण आहार व औषधोपचार होणार आहेत. जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे दि. 15 जुलै 2019 ते 14 ऑगस्ट 2019 या कालावधीत संपूर्ण राज्यात पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियान राबविले जाणार असून या अभियानाचा शुभारंभ मा. मुख्यमंत्री महोदय यांचे शुभ हस्ते व मा. मंत्री, अवजड उद्योग, भारत सरकार, मा. पालकमंत्री, मुंबई शहर तथा मंत्री, उद्योग व खनिकर्म, मा. मंत्री, अन्न, […]
पालघर येथील खोडाळा येथे नवीन वीज उपकेंद्र उभारणीचे निर्देश दिले. याठिकाणी तातडीने वीज उपकेंद्र उभारण्यात येईल व विजेच्या प्रश्नातून जनतेची सुटका होईल.
भारतीय जनता पार्टी महाड १९४, महाड विधानसभा मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी आमदार प्रविणजी दरेकर, बिपीन महामुनकर, राजेश भोसले, जयंत दळवी, अनंत माने, इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रायगड जिल्हा दौऱ्या दरम्यान महाड तालुक्यातील विकास काम आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते तालुक्यातील सुरू असलेली विकासकामे व प्रलंबित विकासकामांबाबत माहिती घेऊन तालुक्यातील जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा बाबतचे आदेश दिले.