रायगड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील नूतन नियोजन भवनाच्या उदघाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांसमवेत…
रायगड जिल्हा दौऱ्या दरम्यान मौजे रासळ जिल्हा रायगड येथील कंत्राटी कामगारांच्या समस्या व एच ओ सी रसायनी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याबाबत बैठक अलिबाग येथे घेण्यात आली. संबंधित अधिकारी यांना योग्य ती कार्यवाही करण्या संदर्भात आदेश दिले.
पनवेल येथील नियोजित उपजिल्हा रुग्णालय कामकाजाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत 15 दिवसात कामकाज पूर्ण करण्यासाठी संबंधित आदेश दिले..
पनवेल येथील नियोजित उपजिल्हा रुग्णालय कामकाजाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत 15 दिवसात कामकाज पूर्ण करण्यासाठी संबंधित आदेश दिले..
आज पार पडलेल्या १५व्या भव्य मल्हार रोजगार मेळावा २०१९ साठी ३६८० उमेदवारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्यातील ७०% उमेदवार पनवेल पालिका क्षेत्रातील असुन इतर उरण,पेण,कर्जत तसेच नवी मुंबई परिसरातील आहेत. याच वेळी रोजगार मेळाव्यासाठी ७०२ रोजगार हमी पत्र देण्यात आले तसेच दुसऱ्या फेरीसाठी ९२३ विद्यार्थ्यांना कंपनीत मुलाखतीसाठी बोलवले आहे.
‘आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार सोहळा २०१९’ नुकताच संपन्न झाला. त्यासोबतच ‘डोंबिवलीकर-एक सांस्कृतिक परिवारा’च्या दशकपूर्ती विशेषांकाचे प्रकाशन सुद्धा करण्यात आले. यावेळी प्रकाशनप्रसंगी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव-सीमा देव, अध्यक्ष अडगुरू भरत दाभोडकर आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई (A) रासप महायुती २८-मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्री. मनोजजी कोटक यांचे प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेला संबोधित करतांनाची क्षणचित्रे. #BJP #Shivsena #BhaJaPa
सुधागड तालुका रहवासी सेवा संघ डोंबिवली-कल्याण तालुका यांच्यातर्फे भव्य कबड्डीचे सामने आयोजित करण्यात आले होते. या सोहळ्यास कल्याण-डोंबिवली, ठाणे, पुणेसह सुधागड तालुक्यातील सर्व पदाधिकारी, खेळाडू व रहिवाशांनी उपस्थित होते. यावेळी सर्वांशी संवाद साधला.
भारतीय जनता पार्टी डोंबिवली पूर्व कार्यालयात ‘भारतीय जनता पार्टी वर्धापन दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने कार्यक्रमात उपस्थित मान्यवर व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधला आणि शुभेच्छा दिल्या.
‘रंग’ ही होळीची अलिकडे झालेली ओळख. परंतु होळीसह रंगपंचमीचा खरा अर्थ जो समजून घेईल तो नक्कीच पर्यावरणपूरक होळीचा, रंगपंचमीचा पुरस्कर्ता ठरेल. सण हे आनंदाने साजरे करण्यासाठी असतात. ते साजरे करताना आपल्या आनंदाबरोबरच सभोवतालच्या पर्यावरणाचा विचार करणेही गरजेचे आहे. डोंबिवलीकरांनी अश्याच पर्यावरण पूरक अनोख्या रंगपंचमीचा आनंद ‘डोंबिवलीकर – एक सांस्कृतिक परिवारा’च्या माध्यमातून घेतला. ‘वैश्विक रंगोत्सव २०१९’ […]