देशातील प्रत्येक घटकाला सर्वोत्तम आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी मोदी सरकारने सुरु केलेली आयुष्मान भारत जनआरोग्य योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून देशाच्या शहरी भागातील दारिद्र्यरेषेखालील आणि मध्यमवर्गीय घटकांतील कुटुंबांना दरवर्षी ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मिळत आहेत
📝 अर्ज कोण करू शकतो ?
धोबी/वॉचमन
मोची
कचरा गोळा करणारे
फेरीवाले आणि पथविक्रेते
मॅकेनिक, इलेक्ट्रिशियन, रिपेअरमन
प्लंबर, सुतार, गवंडी, हमाल
घरकाम करणारे
वेल्डर, पेंटर
सफाई कर्मचारी
ड्रायव्हर, कंडक्टर, हेल्पर, गाडी किंवा रिक्षा चालक
हस्तकला कारागीर
लघु उद्योगांतील मदतनीस
टेलर
डिलिव्हरी बॉय, दुकानदार आणि वेटर
✅ पात्रता निकष
घरात दुचाकी/रिक्षा/चारचाकी वाहने तसेच मोटारवर चालणारी मासेमारी बोट नसावी तसेच आपल्या शेतजमिनीत यांत्रिक शेती उपकरणे नसावीत.
५०,००० रुपये क्रेडिट मर्यादेसह किसान कार्ड नसावे.
कुटुंबातील कोणीही सरकार व्यवस्थापित / शासकीय सेवेत कार्यरत नसावे.
कुटुंबातील सरकार-व्यवस्थापित बिगर-कृषी उपक्रमांमध्ये कार्यरत नसावे.
मासिक उत्पन्न १०,००० रु. किंवा त्यापेक्षा कमी असावे.
घरात रेफ्रिजरेटर आणि लँडलाईन नसावे.
कुटुंबाच्या मालकीचे चांगले/पक्के घर नसावे.
आपल्या मालकीची ५ एकर किंवा त्याहून अधिक शेतजमीन नसावी.
अर्ज करण्याची प्रक्रिया:
आयुष्मान भारत PM-JAY च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या (beneficiary.nha.gov.in).
‘मी पात्र आहे का’ या पर्यायावर क्लिक करून तुम्ही योजनेसाठी पात्र आहात की नाही ते तपासा.
आवश्यक माहिती भरून ऑनलाइन अर्ज पूर्ण करा.
जर तुम्हाला ऑनलाइन अर्ज भरण्यात अडचण येत असेल, तर जवळच्या CSC मध्ये जाऊन अर्ज भरू शकता.
अर्ज भरल्यानंतर, तुमचा आधार क्रमांक वापरून KYC प्रक्रिया पूर्ण करा.
Leave Your Comment