लघु उद्योजक आणि किरकोळ व्यापाऱ्यांना या योजनेअंतर्गत वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा
₹ ३००० पेन्शन मिळेल आणि वयाची ६० वर्षे पूर्ण होण्यापूर्वी एखाद्या लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्ती वेतन म्हणून ५०% पेन्शन मिळण्याचा हक्क असेल.
✅ पात्रता निकष
अर्जदाराच्या उद्योगधंद्याची वार्षिक उलाढाल १.५ कोटीपेक्षा जास्त नसावी.
अर्जदार हा दुकानाचा स्वतः मालक असावा किंवा व्यापारी असावा.
अर्जदार १८ ते ४० वर्ष या वयोगटातील असावा.
अर्जदार आयकरदाता नसावा.
NPS, ESIC, EPFO आणि प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना अशा इतर पेन्शन योजनांचा
लाभार्थी नसावा.
📄 आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
जन धन बँक अकाउंटचा संपूर्ण तपशील
जवळील कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन किंवा खाली दिलेल्या वेबसाइटमार्फत तुम्ही पेन्शनसाठी अर्ज करू शकता.
Leave Your Comment