पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेद्वारे भूमिहीन शेतमजुरांसह चालक, रिक्षाचालक, मोची, शिंपी, मजूर, घरकामगार, भट्टी कामगार अशा असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना वृद्धापकाळात पेन्शन दिली जाते
✅पात्रता निकष
अर्जदाराचे वय १५ ते ४० वर्षांदरम्यान असावे
अर्जदार रोजंदारीवर चालणाऱ्या आणि निश्चित पगार/ रजा / पेन्शन नसणाऱ्या कुठल्याही
असंघटित क्षेत्रातील कामगार असावा
अर्जदाराचे मासिक उत्पन्न १५,००० रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणे अनिवार्य आहे
अर्जदाराचे बँक अकाउंट (सेव्हिंग अकाउंट) आधार कार्डशी संलग्र असणे अनिवार्य आहे.
अर्जदार ईपीएफओ, एनपीएस, ईएसआयसी सारख्या योजनांचा लाभार्थी नसावा.
केंद्र किंवा राज्य सरकारच्या कुठल्याही विभागात कायम, तात्पुरते किंवा कंत्राटी तत्त्वावर काम केलेले नसावे.
अर्जदाराने कधीही इन्कमटॅक्स किंवा उत्पन्नावर कर भरलेला नसावा
📄 आवश्यक कागदपत्र
आधार कार्ड
बँक पासबुक
भ्रमणध्वनी क्रमांक
क्यानुसार पहिले मासिक अंशदान
श्रम यूएएन कार्ड नंबर (ऐच्छिक)
जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात किंवा https://maandhan.in/ या अधिकृत वेबसाईटवर लॉगइन करून या योजनेसाठी अर्ज दाखल करू शकता.
Leave Your Comment