बाल मृत्युदरात घट आणि गरोदर मातेच्या आरोग्याची काळजी घेणे या उद्देशाने राज्यातील शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा शासकीय रुग्णालयात गरोदरपणी नाव नोंदणी करणाऱ्या व त्याठिकाणी प्रसूती होणाऱ्या महिलांना पहिल्या प्रसूतीच्या वेळी नवजात बालकाकरिता (मुलगा किंवा मुलगी) २ हजार रुपयांपर्यंत बेबी केअर किट बॅग मोफत उपलब्ध करून दिली जाते.
बेबी केअर किटचे स्वरूप
– लहान मुलांचे कपडे
– प्लास्टीक लंगोट
– लहान मुलांची झोपण्याची लहान गादी
– लहान मुलांचे टॉवेल
– इलेक्ट्रॉनिक थर्मामिटर
– लहान मुलांना अंगाला लावण्याचे तेल – 250 मि.ली.
– मच्छरदाणी
– लहान मुलांसाठी गरम ब्लँकेट
– लहान चटई प्लास्टीक
– लहान मुलांचा शॅम्पू – 60 मि.ली.
– खुळखुळा
-लहान मुलांची नखे काढण्यासाठी नेलकटर
– लहान मुलांसाठी हातमोजे व पायमोजे
– आईसाठी हात धुण्याचे लिक्विड
– लहान मुलाला बांधून ठेवण्यासाठी कापड/ आईसाठी लोकरीचे कापड
– लहान मुलांसाठी बॉडी वॉश लिक्वीड
– सर्व साहित्य ठेवण्यासाठी लहान बॅग
📝 अर्ज कुठे करायचा?
शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र/शासकीय रुग्णालयात नाव नोंदणी केलेल्या महिलेने गरोदरपणी ९व्या महिन्यात जवळच्या अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकेला माहिती/ अर्ज दिल्यानंतर अंगणवाडी सेविकेकडून संबंधित लाभार्थ्यांना बेबी केअर किट बॅग उपलब्ध करुन देण्यात येते.
Leave Your Comment