माझी कन्या भाग्यश्री योजना ही मुलींच्या विकासासाठी आणि त्यांना समान संधी देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेमुळे मुलींना शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक सुरक्षा मिळण्यास मदत होते.
✅ पात्रता निकष
अर्जदाराचे कुटुंब महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावे.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹7.5 लाखांपेक्षा कमी असावे.
पहिल्या मुलीच्या जन्मानंतर एका वर्षाच्या आत किंवा दुसऱ्या मुलीच्या जन्मानंतर सहा महिन्यांच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असावी.
एका कुटुंबातील केवळ दोन मुलींनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो.
मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत अविवाहित असावी आणि किमान दहावी उत्तीर्ण असावी.
मुलीचे जन्म प्रमाणपत्र आवश्यक आहे
📄 आवश्यक कागदपत्रे
मुलीचे जन्म प्रमाणपत्र
पालकांचे आधार कार्ड
कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे प्रमाणपत्र
पालकांचे संमतीपत्र (अनाथ मुलींसाठी – बाल कल्याण समितीचा दाखला)
बचत खाते (PMJDY अंतर्गत)
अधिक माहिती व अर्जासाठी संपर्क करा:
आपल्या स्थानिक अंगणवाडी सेविका किंवा बाल विकास प्रकल्प अधिकारी (CDPO) यांच्याशी संपर्क साधा
Leave Your Comment