अनुसूचित जाती/जमातीतील पुरुष तसेच सर्व समाजघटकांतील महिला होतकरु उद्योजकांना पाठबळ मिळावे यासाठी १० लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत कर्जाऊ रक्कम उपलब्ध करून देण्यात येते.
✅ पात्रता निकष
होतकरू उद्योजक पुरुष असल्यास अनुसूचित जाती/जमातीतील असणे अनिवार्य आहे. सर्व घटकांतील होतकरु उद्योजक महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
पहिल्यांदा व्यवसाय सुरु करणाया व्यावसायिकांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
अर्जदाराचे नाव कोणत्याही बँक / वित्तीय संस्थेच्या डिफॉल्टर यादीत नसावे.
नौन-इंडिव्हिज्युअल एंटरप्राइझेससाठी कर्ज घ्यायचे असल्यास त्यांचे ५१% शेअर्स अनुसूचित जाती/जमातीतील एखाद्या पुरुषाकडे किंवा कुठल्याही समाजघटकातील महिलेकडे असणे आवश्यक आहे.
Leave Your Comment