देशाच्या ग्रामीण भागात हागणदारीमुक्त गावांची संख्या (ODF Villages) वाढवणे, तसेच घन कचरा व स्वच्छतेचं योग्य व्यवस्थापन करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीतून सुरु झालेल्या या अभियानात देशवासियांनी हिरीरीने सहभाग घेतला.
✅या योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय उभारणीसाठी अनुदानास पात्र कुटुंबं
दारिद्र्यरेषेखालील सर्व कुटुंबं
अनुसूचित जाती/ जमातीतील कुटुंब
शारीरिकदृष्ट्या विकलांग सदस्य असलेली कुटुंबं
भूमिहीन शेतमजूर, अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी या सर्वांना वैयक्तिक शौचालयासाठी १२,००० रुपये पर्यंत अनुदान दिले जाईल
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत घर बांधताना ज्यांच्या घरात स्वच्छता सुविधा उभारण्यात आली नव्हती, अशा कुटुंबांना घरात स्वच्छता सुविधा निर्माण करायची असल्यास स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्रोत्साहन अनुदान देण्यात येईल.
📄 आवश्यक कागदपत्र
आधार कार्ड
बँक पासबुक
पासपोर्ट साईज फोटो
📝 https://sbmurban.org/ या अधिकृत वेबसाईटच्या माध्यमातून आपण अनुदानासाठी अर्ज करू शकता.
Leave Your Comment