की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

उमेदवारी अर्ज भरायला आपली सोबत हवीये!

भाजपा शिवसेना रिपाई रासप शिवसंग्राम रयतक्रांती महायुतीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून मी रविंद्र दत्तात्रय चव्हाण महायुतीच्या सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सोबत १४३ डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता गुरुवार दि ३ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ९ वाजता सम्राट हॉटेल चौक डोंबिवली पश्चिम येथून प्रस्थान करणार आहे.

सर्व कार्यकर्ते, मित्रमंडळी, हितचिंतक, जेष्ठ-श्रेष्ठ यांच्या उपस्थितीत व आशीर्वादाने केडीएमसी कार्यालय इंदिरा गांधी चौक डोंबिवली पूर्व येथे अर्ज दाखल करणार आहे.

आपण सर्व जण आपल्या विचारसरणीशी एकनिष्ठ राहिलो त्यामुळेच एकमेकांच्या साथीने सहवासाने इथपर्यंतचा पल्ला गाठला त्याच विश्वासाला पात्र ठरण्यासाठी पुन्हा एकदा सिद्ध झालो आहे. आपले आशीर्वाद आपले पाठबळ असेच मिळेल ही खात्री आहे.

अभिप्राय द्या..

Close Menu