महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्राचे उद्घाटन व प्राथमिक सामंजस्य करार आदान प्रदान समारंभ येथील सह्याद्री अतिथीगृहात आज झाला. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री गिरीष महाजन, पश्चिम ऑस्ट्रेलियाचे पर्यटनमंत्री श्री पॉल पॅपेलीया, कुलगुरू डॉ. श्री दिलीप म्हैसेकर आणि मी यावेळी उपस्थित होतो. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या या नव्या विभागाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण सुद्धा यावेळी उपस्थितांच्या हस्ते झाले. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था, विद्यापीठांशी झालेले सामंजस्य करार यावेळी हस्तांतरित करण्यात आले.
“वैद्यकीय विज्ञान क्षेत्रातील प्रगत संशोधनामुळे विविध आजारांचे निदान आणि उपचारासाठी योग्य मार्ग सापडले आहेत. त्याचा वैद्यकीय विज्ञान अभ्यासक्रमात समावेश करावा जेणेकरून विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील. राज्यासह देशाला अधिक प्रशिक्षित डॉक्टरांची गरज असून त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देता येईल, यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने सुरू केलेले आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्र महत्त्वाची भूमिका बजावेल”, असा विश्वास राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आज या समारंभात व्यक्त केला.
या समारंभात पुढील संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आला:
Leave Your Comment