गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सरकारने खुशखबर दिली आहे!!
मुंबई-पुणे द्रूतगती आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात पुणे व कोल्हापूरमार्गे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना मुंबईतून जाण्यासाठी १० ते १३ सप्टेंबर तसेच त्याच वाहनांना गणेश विसर्जनानंतर परतण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत या रस्त्यावर लागणाऱ्या टोलमधून सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही सवलत एसटी बसनाही लागू राहील.
Leave Your Comment