की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

रिजनल प्लॅन संदर्भात बैठक

*रिजनल प्लॅन संदर्भात बैठक*

पालघर,ठाणे, रायगड प्रादेशिक आराखडा(regional plan) मधील असलेल्या त्रुटी,दोष हे पालघर जिल्ह्यातील लोकांवर अन्यायकारक आहेत. सादर केलेला प्लॅन तसाच मंजूर केला तर पालघर जिल्ह्याच्या विकासाला 20 वर्षांपर्यंत खीळ बसेल. पालघर जिल्ह्यातील आर्किटेक आणि इंजिनिअर असोसिएशन आणि जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी ह्या विषयावर आवाज उठवला आहे.
काल दि.19 जून रोजी विकास आराखड्यावर माझ्या शासकीय निवासस्थानी बैठक घेण्यात आली. मी विषय ऐकून व समजून घेतला व विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन लगेचच दुसऱ्या दिवशी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव श्री.नितीन करीर ह्यांच्या दालनात बैठक लावली.श्री.करीर साहेबानी गांभीर्याने RP मधील त्रुटी ऐकून घेतल्या व असलेल्या त्रुटी व पालघरकरांनी केलेल्या सूचना मान्य केल्या त्या वर लवकरच योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना देण्याचे सांगितले.
सदर बैठकीत पालघर वास्तुविशारद व अभियंता असोसिएशन च्या वतीने श्री.महेंद्र काळे,श्री.निशांत पाटील,श्री.प्रसन्न गडकरी तर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री.प्रशांत पाटील,प्रदेश सचिव युवा नेते श्री.अंकुर राऊत,युवा जिल्हा सरचिटणीस श्री.समीर पाटील,पालघर शहर अध्यक्ष व कायदे आघाडी अध्यक्ष श्री.जयेश आव्हाड ,युवा अध्यक्ष श्री.हर्षद पाटील ह्यांनी प्रखर पणे आपली बाजू मांडली.

अभिप्राय द्या..

Close Menu