की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

वैश्विक रंगोत्सव २०१९

‘रंग’ ही होळीची अलिकडे झालेली ओळख. परंतु होळीसह रंगपंचमीचा खरा अर्थ जो समजून घेईल तो नक्कीच पर्यावरणपूरक होळीचा, रंगपंचमीचा पुरस्कर्ता ठरेल. सण हे आनंदाने साजरे करण्यासाठी असतात. ते साजरे करताना आपल्या आनंदाबरोबरच सभोवतालच्या पर्यावरणाचा विचार करणेही गरजेचे आहे.

डोंबिवलीकरांनी अश्याच पर्यावरण पूरक अनोख्या रंगपंचमीचा आनंद ‘डोंबिवलीकर – एक सांस्कृतिक परिवारा’च्या माध्यमातून घेतला. ‘वैश्विक रंगोत्सव २०१९’ या कार्यक्रमा अंतर्गत ‘बदलूया विद्रूपतेचे वळण, कलाकृतीतून करूया रंगांची उधळण’  हा संदेश देत कृष्णपूजन, कृष्णभजन, गोफनृत्य, गाणी, चित्र संकल्पना अश्या विविध सांस्कृतिक कला सादर करत बाल गोपालांपासून जेष्ठांबरोबर खऱ्या अर्थाने संस्काराची तसेच कलेची धुळवड साजरी केली.

आजवर डोंबिवलीकरांनी शोभा यात्रा, दिवाळी पहाट सुरु केली परंतु वैश्विक रंगोत्सव हे येणाऱ्या काळात उभ्या महाराष्ट्रात आकर्षण ठरेल हे मात्र नक्की. जवळपास १५० ते २०० महिलांनी सादर केलेले क्रुष्ण भजन, गोफ न्रुत्य अश्या सुंदर कार्यक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.

सदर कार्यक्रमाला स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘साथ दे तू मला’ या मालिकेच्या कलाकारांनी उपस्थिती लावून मनापासून दाद दिली.

अभिप्राय द्या..

Close Menu