की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

‘व्हिजन रायगड’ वेबपोर्टलचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन!

‘व्हिजन रायगड डॉट इन’ या आगळ्या वेगळ्या वेबपोर्टलचे उद्घाटन महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते आज झाले. मा. प्रशांत ठाकूर यांच्या विविध क्षेत्रातील तज्ञ सहकाऱ्यांसोबतच्या विचारमंथनातून साकारलेले ‘व्हिजन रायगड डॉट इन’ हे केवळ वेबपोर्टल नसून भारतभूमीवर प्रथमच घडणारा ‘सोशल इनोव्हेशनचा’ एक आगळा प्रयोग आहे. डिजिटल माध्यमातून आपापल्या विभागांची माहिती संपूर्ण जगापर्यंत पोहोचवू इच्छिणाऱ्या सर्व संस्था व लोकनेत्यांसाठी हा पथदर्शी प्रयोग ठरेल, ह्याची खात्री वाटते.
संकेतस्थळाला नक्की भेट द्या: https://visionraigad.in

#VisionRaigad #DevendraFadnavis #RavindraChavan #Raigad #Webportal#Inauguration

अभिप्राय द्या..

Close Menu