महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा बूट कॅम्प मध्ये डोंबिवलीकरांनो सहभागी व्हा!!!
महाराष्ट्र शासनाने नव उद्यमीना प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्यासाठी आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा या उपक्रमातील सर्वात पहिली कार्यशाळा (बूट कॅम्प) सोमवार ८ ऑक्टोबर रोजी डोंबिवली येथील शिवाजीराव जोंधळे अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे.
डोंबिवलीत होणाऱ्या कार्यशाळेत स्टार्टअप इंडियासंबंधी माहिती देण्यात येईल. तसेच महाराष्ट्रातील यशस्वी नव उद्यमींचे विचार ऐकता येईल. ज्यांनी उद्यमी घडवले आहेत अशा तज्ज्ञांची मते जाणून घेता येतील. तीन तासाच्या खास भागात डोंबिवली परिसरातील नव उद्यमींना आपल्या स्टार्टअप संकल्पनेचे सादरीकरण करण्यास वेळ राखीव ठेवण्यात आला आहे हेच या उपक्रमाचे खास वैशिष्ट्य आहे.
पुढील महिनाभर महाराष्ट्रातील विविध १६ शहरांमध्ये कार्यशाळा तसेच तेवढ्याच शहरात यात्रा रथाचे थांबे करण्याचे प्रयोजन असून प्रत्येक शहरातील नव उद्यमींना आपली स्टार्टअप संकल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक शहरातील स्टार्टअपची निवड करून ३ नोव्हेंबर रोजी भव्य अंतिम फेरी नागपुरात आयोजित करण्यात आली आहे. यशस्वी स्टार्टअपला शासनाचे आर्थिक पाठबळ, तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार असल्याने डोंबिवलीकर नव उद्यमींनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे आणि आपल्या शहराचे नाव उज्वल करावे.
सर्व नव उद्यमींना मनःपूर्वक शुभेच्छा !
**
कार्यक्रम स्थळावरच सकाळी ९.३० ते ११ दरम्यान आपली नावे नोंदणी करायची आहे.
दिनांक: ८ ऑक्टोबर २०१८
वेळ: सकाळी ९ ते सायंकाळी ५
ठिकाण: शिवाजीराव जोंधळे अभियांत्रिकी महाविद्यालय, वेंकटेश पेट्रोल पंपाजवळ, कल्याण शीळ रोड, सोनारपाडा, डोंबिवली पूर्व.
Leave Your Comment