की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

कल्याणचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी संपवण्यासाठी बैठक

Image may contain: 1 person, sitting and indoor

कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडची समस्या सोडविण्यासाठी एक बैठक आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत मुंबई येथे झाली. मंत्री योगेश सागर यावेळी उपस्थित होते.

आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड न्यायालयाच्या आदेशानंतर शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे प्रयोजन असल्याचे पालिका प्रशासनाकडून लेखी आणि तोंडी सांगितले जात होते तरी प्रत्यक्षात आजही शहरात तयार होणार शेकडो टन कचरा आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवरच टाकला जात होता. या कचऱ्यातून मिथेन तयार होत त्याचा हवेशी संपर्क येताच तो पेट घेतल्याचे कारण प्रशासनाकडून सांगण्यात यायचे. तरी डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा दरवर्षी उन्हाळ्यात पेट घेत असल्याची वस्तुस्थिती आहे. कचरा प्रश्न उग्र असताना अनेक सामाजिक संस्था, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी तीव्र आंदोलने केली होती.

आधारवाडी डंपिंग ग्राऊंड पूर्णतः बंद झाले पाहिजे आणि कल्याणचा कचरा प्रश्न कायमस्वरूपी संपला पाहिजे अशीच भूमिका आहे. त्यासाठी आवश्यक निधीही उपलब्ध करून दिला आहे. आधारवाडी डंपिंग ग्राऊंडमध्ये तातडीने लक्ष घालून कार्यवाही करा. सामाजिक संस्था आणि लोकसहभाग मिळत असेल त्यांना सामावून घ्या. प्रायोगिक तत्वावर 5 एकर जागा तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी आयुक्त गोविंद बोडके यांना दिले. त्यासोबतच उंबर्डे येथील 350 मेट्रिक टन कचरा विघटन करण्याची क्षमता असलेला प्रकल्प आणि 2 बायोगॅस प्रकल्प 15 सप्टेंबर 2019 पर्यंत सुरू करण्याचे आदेश दिले. बारावे येथील SLF प्रकल्पालाबाबत देवधर समितीच्या माहितीनुसार सकारात्मक निर्णय घेतला जाईल. मात्र कडोंमपाने जर कचरा प्रश्नावर ठोस काम करत गतीशीलता दाखवली नाही तर परिणामी आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांचे पगार थांबविणार असेही मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी बैठकीत सांगितले.
कचर्‍याचे शास्त्रीय वर्गिकरण आणि येथील कचर्‍याचे डम्पिंग कालबद्धरितीने बंद करण्यासाठीच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

अभिप्राय द्या..

Close Menu