ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समुह रुग्णालये, मुंबई येथे रुग्ण सेवा तसेच विद्यार्थी यांच्यासाठी विविध नविन उपक्रम सुरु करण्यात आले.त्यांचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला :
रक्तघटक विलगीकरण केंद्र (Blood component separation Unit), रक्तपेढी विभाग – लिथोट्रिप्सी विभाग, (Urology)
दिव्यांग रुग्णांसाठी वेगळा बाह्य रुग्ण विभाग
रुग्णालयाचा नवीन वातानुकूलीत औषध वितरण केंद्र
रुग्णालयाचे नवीन सुसज्ज स्वयंपाकघर
Medical Innovation Creativity & Entrepreneurship (MICE) lab
Club Foot Clinic (Orthopedics)
अशा विविध उपक्रमांचे उद्घाटन आज बुधवार, दिनांक ५ सप्टेंबर २०१८ रोजी सन्माननीय श्री. गिरीषजी महाजन, मंत्री, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन, सन्माननीय श्री. रविंद्र चव्हाण, राज्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, खाद्य आणि नागरी पुरवठा, ग्राहक सरंक्षण आणि बंदरे, महाराष्ट्र शासन, मा. खासदार श्री. अरविंद सावंत, लोकसभा सदस्य, मा. आमदार श्री, अमिन पटेल, विधानसभा सदस्य, मा. आमदार श्री. वारीस पठाण, विधानसभा सदस्य, सन्माननीय श्री. संजय देशमुख, सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग, महाराष्ट्र शासन यांचे शुभ हस्ते करण्यात येणार आहे.
तसेच सदरील कार्यक्रमास डॉ. प्रविण शिनगारे, संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई व डॉ. प्रकाश वाकोडे, सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, सहसंचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई, डॉ. जे.व्ही.तुपकरी, प्रभारी सहसंचालक (दंत) वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
Leave Your Comment