समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी यांच्यासह सर्व घटकांच्या विकासासाठी शासन विविध कल्याणकारी योजना राबवित असून या सर्व घटकांच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७०व्या वर्धापन दिनाचा रायगड जिल्ह्यातील मुख्य शासकीय समारंभ अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानावर मोठ्या उस्ताहात पार पडला. या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदितीताई तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे […]
भारत माता की जय!!!! अलिबाग येथील भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व ध्वजवंदन करण्यात आली. उपस्थित सर्व पदाधिकारी, अधिकारी व कार्यकर्ते यांच्यासमवेत यावेळी संवाद साधला.
रायगड जिल्हा दौऱ्या दरम्यान सकल मराठा समाज अलिबाग यांच्यातर्फे ‘आत्मसन्मान मेळावा’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सहभागी होऊन उपस्थित मराठा बांधवांशी संवाद साधला.
एस. एस. निकम इंग्लिश स्कूल ऍन्ड ज्युनियर सायन्स कॉलेज या विस्तारित इमारत उद्घाटन समारंभ माणगांव येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी आमदार प्रशांतजी ठाकूर, आमदार अनिकेतजी तटकरे, संस्थेचे संचालक मंडळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील उरण मधील करंजा येथे ‘करंजा मत्स्यव्यवसाय बंदर भूमिपूजन समारंभ’ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, केंद्रीय दळवळण मंत्री नितीनजी गडकरी, महादेवजी जानकर, अर्जुनजी खोतकर, आमदार प्रशांतजी ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, रामशेठ ठाकूर, महेश बालदी व इतर मान्यवर उपस्थित होते.
ओंकार एज्युकेशनल ट्रस्ट आयोजित ‘ज्ञानोत्सव २०१९’ हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सांगता समारंभात उपस्थित मान्यवर, सर्व गुरुजन मंडळ, सर्व पदाधिकारी, पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला. कै. सुरेंद्र बाजपेई सरांच्या विविध पैलूंचे दर्शन या ज्ञानोत्सवाच्या निमित्ताने व्हावे या हेतूने सर्वांशी संवाद साधला. याप्रसंगी ‘ओमकारियन’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. ज्यात संपूर्ण विद्यार्थ्यांच्या क्रिएटिव्हिटीला वाव […]
‘नगरसेविका चषक 2019’ नेहरू मैदान डोंबिवली येथे आयोजित करण्यात आला होता. उद्घाटनप्रसंगी नगरसेविका खुशबू चौधरी व खेळाडू उपस्थित होते. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या.
श्री दत्तकृपा वाहन चालक मालक कल्याणकारी संस्था काराव, गडब नामफलक अनावरण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, तालुका अध्यक्ष गंगाराम पाटील, महेश मोहिते, राजेश मापरा, मिलिंद पाटील, पदाधिकारी, इतर मान्यवर आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सर्वांशी संवाद साधताना…
जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्था डोंबिवली आयोजित “आम्ही मराठी” मराठमोळ्या पोवाडा व स्फूर्तीगीत कार्यक्रम व सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली. या पूजेसाठी उपस्थित सर्व मान्यवर व पदाधिकारी यांच्याशी संवाद केला.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित देशातील सर्वात मोठा कला व क्रीडा महोत्सव C.M. चषक ठाणे जिल्हास्तरीय स्पर्धा दिवा येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी दिवा मंडळ अध्यक्ष आदेश भगत , प्रदेश अल्पसंख्याक महिला अध्यक्ष रिदा रशीद ,निलेश पाटील, कार्यकर्ते ,पदाधिकारी, स्पर्धक व इतर मान्यवर उपस्थित होते…