पंतप्रधान मोदीजींच्या ‘डिजिटल इंडिया’मुळे प्रत्येक क्षेत्राला ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध होतंय आणि जगाची बाजारपेठ खुणावती आहे. आपल्या साखरेला ऍपच्या माध्यमातून जगाशी जोडणाऱ्या झाले. आता शेतकरी, व्यापारी व कारखानदारांना गोड बातम्या मिळो.
जयसिंगपूरच्या मालू कुटुंबीयांचा ‘लेक माझी’ हा मुलींना आर्थिक पाठबळ देणारा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे. बाबुलाल मालू हे समाज मत जाणून घेणारे व्यवसाय क्षेत्रातील व्यक्तीमत्व आहेतच, पण त्यांच्या माणूसकीचे दर्शन या उपक्रमातून संपूर्ण महाराष्ट्रास परिचित आहे.
‘शिधापत्रिकांचे डिजिटायझेशन आणि धान्याची बचत’ या विषयावरील माझी मुलाखत माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय_महाराष्ट्र’ कार्यक्रमात दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून मंगळवार दि. ११ डिसेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित झाली. मंत्री पदाच्या कालावधीत घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय, ई-पॉस धान्य वितरण प्रणाली, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना, जळगाव येथील पहिला मेडिकल हब पंडित दीनदयाळ उपाध्याय शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक […]
९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मा. अध्यक्षा अरुणाजी ढेरे यांना मसाप, डोंबिवली आणि समस्त ‘डोंबिवलीकर’ परिवारातर्फे ‘सन्मानपत्र’ प्रदान करण्यात आले. याप्रसंगी डोंबिवलीतील साहित्यिक क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ मान्यवर श्री. आबासाहेब पटवारी, श्री. वामनराव देशपांडे, श्री. सुधीरभाऊ जोगळेकर, श्री. सुरेश देशपांडे, श्री. प्रल्हाद देशपांडे आणि साहित्यरसिक उपस्थित होते. अरुणाजी ढेरे यांचे पुनःश्च अभिनंदन व शुभेच्छा!!!
डोंबिवली येथील नेहरू मैदान येथे ‘आयप्पा स्वामी पूजा’ आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक भाविकांनी व मान्यवरांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार वाहून अभिवादन केले.
दि. 11 ते 13 नोव्हेबर 2018 रोजी लातूर येथे झालेल्या 16 वी राज्यस्तरीय सब ज्युनिअर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत ठाणे जिल्हा संघ उपविजयी झाल्याबद्दल सर्व खेळाडूचे अभिनंदन व पुढील स्पर्धेकरिता हार्दिक शुभेच्छा. बक्षीस समारंभाप्रसंगी परीक्षक मान्यवर व खेळाडू उपस्थित होते.
‘कच्छ युवक संघ, डोंबिवली’ तर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आयोजित रक्तदान शिबिरात मान्यवरांसोबत संवाद साधला गेला.
तिरुपती तिरुमला देवस्थान (टी.टी.डी.) आणि ओम श्री साई धाम ट्रस्ट (विरार) आयोजित केलेला ‘श्रीनिवास मंगल महोत्सव’ हा ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथे संपन्न झाला. श्रीनिवास मंगल महोत्सवात पूजेच्या वेळी अनेक मान्यवर आणि भक्तवर्गाची गर्दी जमली होती.
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘CM चषक’ या देशातील सर्वात मोठा क्रीडा व कला मोहत्सवाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात होत आहे. डोंबिवली मधील नेहरु मैदान येथे ‘शेतकरी सन्मान कब्बडी’ स्पर्धेने या चषकाचा शुभारंभ करण्यात आला. विविध शाळा, महाविद्यालय तसेच क्रीडा मंडळातुन हजारो स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यमंत्री ना. श्री. रविंद्रजी […]