रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची समग्र माहिती पर्यटकांना उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांनी तयार केलेल्या ‘रायगड: पर्यटन विविधा’ या ई-बुकचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच रायगड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना माहिती देणाऱ्या मोबाईल ॲपचेही उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने मी तसेच माझे सहकारी पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. हे ई- बुक महाजालावर www.raigadtourism.com येथे तसेच मराठी ई- पुस्तकांच्या सर्व दालनांवर उपलब्ध असेल. तसेच रायगड जिल्ह्याचे संकेतस्थळ www.raigad.nic.in येथेही या ई-बुकची लिंक उपलब्ध करण्यात आली आहे.
Leave Your Comment