१९६६च्या महाराष्ट्र चित्रपट नियमानुसार कलम १२१ मध्ये सांगितल्याप्रमाणे मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही. लोकांना असे करण्यापासून रोखण्याचा अधिकार कोणत्याही मालकाला नाही. आम्ही त्याबद्दल अगदी स्पष्ट आहोत. मी विधानसभेत माझ्या प्रतिसादात हे स्पष्ट केले आणि मी अजूनही माझा निर्णय कायम ठेवत आहे. ‘मुंबई मिरर’ वर्तमानपत्रातील याविषयावर आज (१० ऑगस्ट २०१८) रोजी आलेली माझी मुलाखत : https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/multiplex-owners-are-misleading-moviegoers/articleshow/65345642.cms https://mumbaimirror.indiatimes.com/mumbai/cover-story/the-big-screen-fleece/articleshow/65380000.cms
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्राचे उद्घाटन व प्राथमिक सामंजस्य करार आदान प्रदान समारंभ येथील सह्याद्री अतिथीगृहात आज झाला. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री गिरीष महाजन, पश्चिम ऑस्ट्रेलियाचे पर्यटनमंत्री श्री पॉल पॅपेलीया, कुलगुरू डॉ. श्री दिलीप म्हैसेकर आणि मी यावेळी उपस्थित होतो. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या या नव्या विभागाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण सुद्धा यावेळी […]
उत्तर काश्मिरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या मोठ्या कारवाईत महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना वीरमरण आलं. मीरा रोडच्या शीतल नगर येथील हिरल सागर इमारतीत राणे कुटुंब राहतं. ते मूळचे कोकणातल्या वैभववाडीचे आहेत. यंदा कौस्तुभ यांना सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते. मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या […]
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औरस येथील श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट, कासल च्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग आयोजित समारंभात उपस्थित प्राचार्य विद्यार्थी व इतर मान्यवरांशी सुसंवाद…
सिंधुदुर्ग जिल्हा दौरा औरस येथील ग्रामपंचायत विकास कामांबाबत प्रमुख पदाधिकारी व ग्रामपंचायतमधील सदस्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला.
आमचे सहकारी मित्र व पनवेलचे आमदार श्री.प्रशांतजी ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराच्या उदघाटन प्रसंगी मान्यवरांसोबत
महाडीबीटी पोर्टलचे काम अंतिम टप्प्यात असून या पोर्टलमुळे विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा होण्यास मदत होणार आहे. या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक संस्थांना राज्य शासनामार्फत देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम मिळण्यास विलंब होत असला, तरी संस्थांनी विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींना केले आहे. तसेच राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेचा […]