पालघर येथील खोडाळा येथे नवीन वीज उपकेंद्र उभारणीचे निर्देश दिले. याठिकाणी तातडीने वीज उपकेंद्र उभारण्यात येईल व विजेच्या प्रश्नातून जनतेची सुटका होईल.
भारतीय जनता पार्टी महाड १९४, महाड विधानसभा मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी आमदार प्रविणजी दरेकर, बिपीन महामुनकर, राजेश भोसले, जयंत दळवी, अनंत माने, इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रायगड जिल्हा दौऱ्या दरम्यान महाड तालुक्यातील विकास काम आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते तालुक्यातील सुरू असलेली विकासकामे व प्रलंबित विकासकामांबाबत माहिती घेऊन तालुक्यातील जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा बाबतचे आदेश दिले.
पालघर जिल्हातील जव्हार तालुक्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी आदिवासी विकासभवन जव्हार येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तालुक्यातील अडचणी व समस्या समजावून घेतल्या. तसेच शासकीय भात खरेदी केंद्राबाबत जनजागृती करण्यात यावी, शासनाच्या विविध योजनांचा तालुक्यातील जनतेला लाभ मिळावा असे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
पालघर जिल्हा दौऱ्या दरम्यान ट्राईन पालघर आदिवासी कलाकृती प्रदर्शनी दालन व विक्री केंद्र ए. आ. वि. प्र. जव्हारच्या उदघाटनप्रसंगी जिल्हा परिषद सीईओ मिलिंद बोरीकर, अधिकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
मोखाडा तालुक्यातील विकासकाम आढावा बैठक मोखाडा पंचायत समिती आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तालुक्यातील झालेली विकासकामे व प्रलंबित विकासकामांबाबत आढावा घेतला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला झाला पाहिजे व तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुर्दशाबाबत तातडीने दुरुस्ती काम सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडची समस्या सोडविण्यासाठी एक बैठक आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत मुंबई येथे झाली. मंत्री योगेश सागर यावेळी उपस्थित होते. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड न्यायालयाच्या आदेशानंतर शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे प्रयोजन असल्याचे पालिका प्रशासनाकडून लेखी आणि तोंडी सांगितले जात होते तरी प्रत्यक्षात आजही शहरात तयार होणार शेकडो टन कचरा आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवरच […]
कल्याणच्या सुश्मिता सिंगने आपल्या पहिल्याच प्रयत्नात थेट जागतिक सौंदर्यस्पर्धेच्या खिताबावर आपले नाव कोरले आणि ऐतिहासिक कल्याण शहराचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर लिहिले गेले. सुश्मिताच्या या देदीप्यमान यशाबद्दल हार्दिक अभिनंदन! मिस टिन वर्ल्ड 2019 विजेती, कल्याणची सुश्मीता सिंग हिच्या भव्य नागरी सत्कार प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांसमवेत शुभेच्छा देताना!
मुंबई महानगर प्रदेशात पालघर, ठाणे, रायगड या विभागांचा समावेश करण्याच्या ठरावाला विधानसंभेत मंजुरी!
*रिजनल प्लॅन संदर्भात बैठक* पालघर,ठाणे, रायगड प्रादेशिक आराखडा(regional plan) मधील असलेल्या त्रुटी,दोष हे पालघर जिल्ह्यातील लोकांवर अन्यायकारक आहेत. सादर केलेला प्लॅन तसाच मंजूर केला तर पालघर जिल्ह्याच्या विकासाला 20 वर्षांपर्यंत खीळ बसेल. पालघर जिल्ह्यातील आर्किटेक आणि इंजिनिअर असोसिएशन आणि जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी ह्या विषयावर आवाज उठवला आहे. काल दि.19 जून रोजी विकास आराखड्यावर […]