भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून डोंबिवलीत आयोजित होणाऱ्या दहीहंडीचे यंदाचे १० वे वर्ष आहे. दरवर्षी आपण एक सामाजिक विषय घेऊन आपला गोपाळकाल्याचा मराठमोळा सण अतिशय उत्साहात तितक्याच जबाबदारीने साजरा करत असतो. यंदाची आपली थीम आहे ‘#बचत‘. या थीम ला घेऊन यंदाचा गोपाळकाला आपण साजरा करणार आहोत.
आहे. त्यास अनेक कंगोरे आहेत. त्याचे फायदे अनंत आणि दूरगामी आहेत. बचत केवळ पैशांचीच नसते ती पाण्याची, विजेची, वेळेची आणि तितकीच पेट्रोल व अन्य इंधनाचीही तेवढीच अत्यावश्यक आहे. आपल्या राष्ट्राच्या नवनिर्मितीसाठी बचत जशी आवश्यक आहे त्याचप्रमाणे भविष्यासाठी सुद्धा बचत तितकीच महत्वाची आहे. या दही हंडीच्या निमित्ताने या बचतीचे महत्त्व सर्वांना कळावे हा हेतू समोर ठेऊन गोपाळकाल्याच्या हा सण आपण साजरा करूया. दहीहंडीच्या या सोहळ्याचा सर्वांनी जरूर आनंद घ्या.
Leave Your Comment