की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने, लब्ध-प्रकाश-इतिहास-निसर्गमाने...

जलवाहतूकीच्या जेट्टीचे डोंबिवलीत भूमीपूजन

केंद्रात मोदीजी यांचे सरकार २०१४ साली स्थापन झाल्यावर सागरमाला हा अंतर्गत जलवाहतुकीचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रो ऍक्टिव्ह शैलीमुळे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने त्याला चालना दिली. राज्यातील पहिल्या कार्यान्वित होणाऱ्या जलवाहतूकीमध्ये डोंबिवली ठाणे वसई हा जलवाहतूक मार्ग मैलाचा दगड ठरणार आहे.
डोंबिवलीहुन आपण ठाण्याला १२-१५ मिनिटात, नवी मुंबईत २० मिनिटात तर वसईला पाऊण तासात पोहचता येणार आहे.
या अत्यंत महत्वाकांक्षी जलवाहतूक प्रकल्पातील देवीचा पाडा डोंबिवली पश्चिम येथील जेट्टीचे भूमीपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.
रस्ते व रेल्वेमार्ग याबरोबरच जलवाहतूक हा जलदगतीचा वाहतूक पर्याय उपलब्ध करण्यावर सरकार भर देणार आहे.
ते पुढे म्हणाले की २०१६ साली राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. सकारात्मक विचार केला की सकारात्मक गोष्टी घडतात यावर माझा गाढ विश्वास आहे. माझ्याकडे असलेल्या पोर्ट या खात्याकडे इनलँड वॉटरवेजबाबत सादरीकरण झाले कारण त्यातील महत्वाच्या अशा जेट्टी बांधण्याची जबाबदारी पोर्ट खात्याचीच असते. १३ कोटी खर्च करून मेरिटाईम बोर्ड डोंबिवली जेट्टी बांधणार आहे.

 

Dombivli Jetty

Dombivli Jetty

Dombivli Jetty

अभिप्राय द्या..

Close Menu