गणेशोत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना एसटी, गणपती उत्सव व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात मुंबईतील नागरिकांना त्यांच्या कोकणातील गावी सुखरूप सोडण्यासाठी एसटीने २ हजार २२५ बसेसची सोय केली आहे.
या वर्षी लोकांची मागणी लक्षात घेऊन एसटी महामंडळाने आपल्या इतर विभागाकडून २ हजार २२५ बसेस मुंबईच्या गणपती उत्सवातील वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिल्या असून येत्या ९ ऑगस्ट पासून संगणकीय आरक्षणासाठी या जादा बसेस लावण्यात आल्या आहेत. तसेच ग्रुप बुकिंगला १ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात येत आहे. या ग्रुप बुकिंगसाठी संबंधितांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावाच्या यादीसह आपल्या जवळच्या बस आगारात संपर्क साधा.
Leave Your Comment