डोंबिवलीसाठी अभिमानाचा क्षण ! आंतरराष्ट्रीय ब्रिजपटू व भारतीय संघाचे प्रशिक्षक, डोंबिवलीकर श्री. आनंद सामंत यांचा आज 3 वाजता ब्राह्मण सभा डोंबिबली येथे समस्त डोंबिवलीकर परिवार डोंबिबली ब्रीज असोशिएशन परिवार व समस्त भाजपा परिवार या सर्वांच्या वतीने गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डोंबिवली आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत म्हणून लवकरच भारतीय जनता पार्टी च्या माध्यमातून ब्रीज अकादमीची स्थापना करण्यात येणार असून या उपक्रमात श्री आनंद सामंत यांनी पुढाकार घेणार असल्याचे जाहीर केले! उपस्थित सर्व ब्रीजपटू यांनी व सर्व पदाधिकाऱ्यांनीही सुद्धा श्री सामंत यांचे मनःपूर्वक कौतुक केले.
Seems like a great day for the Bridge Team! Our Men’s team wins a Bronze and so does our Mixed Team. Congratulations to the contingent. #AsianGames2018pic.twitter.com/PgpQX8WAMJ
Leave Your Comment