केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या ‘नागरी सेवा परीक्षा’ देणाऱ्यांसाठी राज्य प्रशासकीय व्यवसाय प्रशिक्षण केंद्रामार्फत ११ महिने पूर्णवेळ विनामूल्य परीक्षा पूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याकरिता मुंबई केंद्रामार्फत ४ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार असून संस्थेमार्फत www.siac.org.in या संकेतस्थळावर अर्ज मागविण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी १३ ऑगस्ट २०१८ ते १४ सप्टेंबर २०१८ असा आहे.
प्रवेश परीक्षा पत्र २३ ऑक्टोबर २०१८ ते ४ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत उपलब्ध होणार असून ४ नोव्हेंबर रोजी प्रवेश परीक्षा असेल. यासाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी सविस्तर जाहिरात, परीक्षेचा अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी सर्व सूचना संस्थेच्या www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
Leave Your Comment