ओंकार एज्युकेशनल ट्रस्ट आयोजित ‘ज्ञानोत्सव २०१९’ हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या सांगता समारंभात उपस्थित मान्यवर, सर्व गुरुजन मंडळ, सर्व पदाधिकारी, पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रांशी संवाद साधला. कै. सुरेंद्र बाजपेई सरांच्या विविध पैलूंचे दर्शन या ज्ञानोत्सवाच्या निमित्ताने व्हावे या हेतूने सर्वांशी संवाद साधला. याप्रसंगी ‘ओमकारियन’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. ज्यात संपूर्ण विद्यार्थ्यांच्या क्रिएटिव्हिटीला वाव देण्यात आला आहे. ओमकार ट्रस्टच्या संस्थापक दर्शना सामंत मॅडम व त्यांच्या संपूर्ण ओमकार परिवाराचे या अनोख्या उपक्रमाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!!!
Leave Your Comment