डोंबिवली शहर हे एक वाचनसंस्कृतीचे माहेरघर मानले जाते. अनेक शिक्षणसंस्था व वाचनालयांनी वाचनसंस्कृती वाढण्यास हातभार लावला आहे. या तंत्रज्ञानाच्या युगात वाचन संस्कृती जोपासणं एक कठीण काम आहे. या डोंबिवली नगरीत आमदार रविंद्र चव्हाण यांनी पाच वर्षांपूर्वी ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार..’ या मासिकाद्वारे वाचन संस्कृतीत अजून भर घातली आहे.
डोंबिवलीकर मासिकाचा प्रमाणबद्ध आकार, बांधणी पानोपानी दिसून येणारी सुस्पष्ट छपाई अनेकप्रकारची सदरे, विविधतेने भरलेली आकर्षक रंगीत चित्रे आणि वाङमयीन साहित्य, डोंबिवलीमध्ये घडलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा तपशील इत्यादी विविधतेने भरलेले ‘डोंबिवलीकर’ ज्यांचे घरी, जणू आनंद तथे वास करी असे आहे.
या डोंबिवलीकर मासिकाच्या माध्यमातून श्री. रविंद्र चव्हाण यांनी डोंबिवली तसेच डोंबिवलीबाहेरील डोंबिवलीकर वाचकांना वाचनाची एकप्रकारे मेजवानीच उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे प्रत्येक वाचक डोंबिवलीकर मासिकाची आतुरतेने वाट पाहतो.
वाचनसंस्कृतीच्या वाढीसाठी वाचनालयाच्या प्रत्येक उपक्रमाला जसे ग्रंथदिंडी, वाचकोत्सव, पुस्तक प्रकाशन सोहळा, पुस्तक प्रदर्शन या सर्व उपक्रमात जातीने लक्ष देवून प्रोत्साहन देत असतात. त्यांचे राजकीय कार्यक्रम, समाजपयोगी कार्ये व इतर सामाजिक उपक्रम यातून वेळ काढून डोंबिवलीमध्ये वाचनसंस्कृती वाढावी यासाठी सदैव प्रयत्नशील असतात. फ्रेन्डस् परिवारातर्फे आमदार श्री. रविंद्र चव्हाण यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!