डोंबिवलीला दुसऱ्यांदा मंत्रीपद, जाणून घ्या रवींद्र चव्हाण यांचा राजकीय प्रवास 9 Aug 2022
भाजपा शिवसेना रिपाई रासप शिवसंग्राम रयतक्रांती महायुतीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून मी रविंद्र दत्तात्रय चव्हाण महायुतीच्या सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सोबत १४३ डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता गुरुवार दि ३ ऑक्टोबर २०१९ रोजी सकाळी ९ वाजता सम्राट हॉटेल चौक डोंबिवली पश्चिम येथून प्रस्थान करणार आहे. सर्व कार्यकर्ते, मित्रमंडळी, हितचिंतक, जेष्ठ-श्रेष्ठ यांच्या उपस्थितीत व […]
लहान मुलांमध्ये आपलं बालपण शोधण्यात वेगळाच आनंद असतो. मुले ही देवाघरची फुले असं म्हंटलं जातं. दरवर्षीप्रमाणे यंदाही डोंबिवली येथील जननी आशिष या संस्थेतील मुलांसोबत वाढदिवस साजरा केला.
केंद्रात मोदीजी यांचे सरकार २०१४ साली स्थापन झाल्यावर सागरमाला हा अंतर्गत जलवाहतुकीचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू झाला. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रो ऍक्टिव्ह शैलीमुळे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने त्याला चालना दिली. राज्यातील पहिल्या कार्यान्वित होणाऱ्या जलवाहतूकीमध्ये डोंबिवली ठाणे वसई हा जलवाहतूक मार्ग मैलाचा दगड ठरणार आहे. डोंबिवलीहुन आपण ठाण्याला १२-१५ मिनिटात, नवी मुंबईत २० मिनिटात तर वसईला […]
दहीहंडीचा सण म्हणजे उत्साहाचा, चैतन्याचा, चढाओढीचा सण! दहीहंडी या सणाची तयारी अनेक दिवसा आधीच करण्यात येते. अगदी जल्लोषात साजरा होणाऱ्या या सणात काही गोष्टींची काळजी घेणे हि गरजेचेच आहे. त्यामुळे शिस्तीने, संयमाने आणि न्यायालयीन निर्णयाचा आदर करत दहीहंडीच्या खेळाचा आनंद घ्या. गोकुळाष्टमीच्या आणि दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा.
रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ताबाडडोह येथील नदी पुलाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, रवीशेठ पाटील, राजेंद्र राऊत, राजेश मापारा, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
पेण येथे एम.एम.आर.डी. ए.च्या माध्यमातून प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील, वैकुंठ पाटील, नगरसेवक, शासनाचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
अनेक वर्षांपासूनचे समस्त डोंबिवलीकरांचे व माझे स्वप्न काल साकार झाले. शालेय शिक्षणासोबत वेदांचे अध्ययन, संस्कृत पठण तसेच याज्ञिकीचे शिक्षण देणारे केंद्र आपल्या डोंबिवली शहरात असावे, भारतीय वेदसंस्कृती आपल्या डोंबिवली परिसरातील पुढच्या पिढीत रुजावी म्हणून वेदपाठशाळा सुरू करण्याचा मानस अनेक वर्षांपासून विद्यमान महासंघाच्या विचाराधीन होता. आता आम्ही `डोंबिवलीकर प्रतिष्ठान’च्या माध्यमातून वेदपाठशाळेसाठी सुसज्ज वास्तू उपलब्ध करून दिल्यामुळे […]
डोंबिवली येथील नगरसेवक मंदार टावरे यांच्या प्रभागात एमएमआरडीएच्या माध्यमातून मंजूर झालेल्या 471 कोटी या निधीतून प्रभागातील रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे भूमिपूजन संपन्न झाले. याप्रसंगी नगरसेवक मंदार टावरे, मच्छिंद्र चव्हाण, संजू बिरवाडकर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरीक मोठया प्रमाणात उपस्थित होते.