महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा बूट कॅम्प मध्ये डोंबिवलीकरांनो सहभागी व्हा!!! महाराष्ट्र शासनाने नव उद्यमीना प्रोत्साहन व मार्गदर्शन देण्यासाठी आयोजित केलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा या उपक्रमातील सर्वात पहिली कार्यशाळा (बूट कॅम्प) सोमवार ८ ऑक्टोबर रोजी डोंबिवली येथील शिवाजीराव जोंधळे अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे. डोंबिवलीत होणाऱ्या कार्यशाळेत स्टार्टअप इंडियासंबंधी माहिती देण्यात येईल. तसेच महाराष्ट्रातील यशस्वी नव उद्यमींचे विचार […]
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त एक विशाल रॅली काढण्यात आली होती. रॅली मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी सर्व ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी आणि सर्व नागरीक…
ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठा नवरात्री महोत्सव ‘नमो नवरात्री’च्या मंडप उभारणीच्या शुभमुहूर्तासाठी उपस्थित सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक श्री संजय धबडे, सुप्रसिद्ध ध्वनी व्यवस्थापक श्री.टिटू कुलकर्णी व इतर मान्यवर उपस्थित होते….
मुंबई येथे आयोजित ‘नॅशनल रबर कॉन्फरन्स’साठी उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी, प्रतिनिधींशी संवाद…
डोंबिवलीकरांच्या सहवासात राजकीय क्षेत्रात कार्यरत राहून आता १६ वर्षे झाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो की नियतीने माझीच निवड केली तेही मला प्रिय असलेलं काम करण्याची.. जनसंपर्क.. लोकांमध्ये राहून काम करणं.. विशेषतः तरुण मुलं-मुलींशी संवाद साधत असताना त्यांचे वेगळे विचार, भन्नाट कल्पना आणि अत्यंत फ्रेश असा दृष्टिकोन पाहताना आपल्यातही एक ऊर्जा उत्पन्न होते हा स्वानुभव आहे. […]
रोहा तालुक्यातील धोंडखार येथील माजी सरपंच श्री. गोवर्धनजी मारुती पाटील यांनी त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसह आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी व लाडके महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर आणि भाजपाच्या विकासाच्या धोरणांवर प्रभावित होऊन सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश घेतला. त्यांचे व सर्व सहकाऱ्यांचे भाजपा तर्फे मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन !!!
माननीय नरेंद्रजी मोदी यांनी ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा म्हणून बिल मंजुरी दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टी तर्फे ‘संपर्क संवाद यात्रा’ या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व सर्व कार्यकर्ते यांच्याशी संवाद…
यंदाचा ‘राज्य शिक्षक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला असून यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर व रायगडचे शिक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत. पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन!
खुल्या प्रवर्गासह इतर मागासवर्ग/ विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनाही आता परदेशातील मिळणार.
कृषी प्रक्रियेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुवर्णसंधी!! देशामधील कृषी प्रक्रिया समुहाच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी ‘प्रधानमंत्री किसान संपदा’ योजनेच्या अंतर्गत संभवनीय प्रवर्तकांकडून/गुंतवणूकदारांकडून प्रस्ताव मागवीत आहेत. तरी इच्छूक गुंतवणूकदारांनी त्यांचे प्रस्ताव पुढील संकेतस्थळावर ऑनलाईन पाठवावे: http://sampada-mofpi.gov.in/login.aspx.