कल्याणच्या सुश्मिता सिंगने आपल्या पहिल्याच प्रयत्नात थेट जागतिक सौंदर्यस्पर्धेच्या खिताबावर आपले नाव कोरले आणि ऐतिहासिक कल्याण शहराचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर लिहिले गेले. सुश्मिताच्या या देदीप्यमान यशाबद्दल हार्दिक अभिनंदन! मिस टिन वर्ल्ड 2019 विजेती, कल्याणची सुश्मीता सिंग हिच्या भव्य नागरी सत्कार प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांसमवेत शुभेच्छा देताना!
मुंबई महानगर प्रदेशात पालघर, ठाणे, रायगड या विभागांचा समावेश करण्याच्या ठरावाला विधानसंभेत मंजुरी!
*रिजनल प्लॅन संदर्भात बैठक* पालघर,ठाणे, रायगड प्रादेशिक आराखडा(regional plan) मधील असलेल्या त्रुटी,दोष हे पालघर जिल्ह्यातील लोकांवर अन्यायकारक आहेत. सादर केलेला प्लॅन तसाच मंजूर केला तर पालघर जिल्ह्याच्या विकासाला 20 वर्षांपर्यंत खीळ बसेल. पालघर जिल्ह्यातील आर्किटेक आणि इंजिनिअर असोसिएशन आणि जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी ह्या विषयावर आवाज उठवला आहे. काल दि.19 जून रोजी विकास आराखड्यावर […]
आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार सोहळा २०१९’ त्यासोबतच ‘डोंबिवलीकर-एक सांस्कृतिक परिवारा’च्या दशकपूर्ती विशेषांकाचे प्रकाशन सुद्धा करण्यात आले. यावेळी प्रकाशनप्रसंगी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव-सीमा देव, अध्यक्ष ऍडगुरु भरत दाभोडकर आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.
‘फ्रेरिया इंडिका’ या वनस्पतीचे शिवराज्याभिषेकदिनानिमित्त ‘शिवसुमन’ असे नामकरण करण्यात आले आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमात सहभागी होण्याची मला संधी मिळाली. या वनस्पतीचा शोध शिवनेरी किल्यावर लागला होता त्यामुळेच शिवराज्याभिषेकदिनी या फुलाचे नामकरण करण्यात आले. हे सुंदर फुल फक्त महाराष्ट्रातच आढळून येते हि बाब आपल्या महाराष्ट्राच्या जैवविविधतेची साक्ष आहे
सालाबादप्रमाणे याही वर्षी हुशार व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय उपयोगी वह्या वाटप करण्यात आल्या. आज दिवसभर अजून 6 ठिकाणी मोफत वह्या वाटप सुरु आहे. गरजूंनी या उपक्रमाचा फायदा घ्यावा… सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा !!!
रायगड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील नूतन नियोजन भवनाच्या उदघाटनप्रसंगी उपस्थित मान्यवरांसमवेत…
रायगड जिल्हा दौऱ्या दरम्यान मौजे रासळ जिल्हा रायगड येथील कंत्राटी कामगारांच्या समस्या व एच ओ सी रसायनी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या मागण्याबाबत बैठक अलिबाग येथे घेण्यात आली. संबंधित अधिकारी यांना योग्य ती कार्यवाही करण्या संदर्भात आदेश दिले.
पनवेल येथील नियोजित उपजिल्हा रुग्णालय कामकाजाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत 15 दिवसात कामकाज पूर्ण करण्यासाठी संबंधित आदेश दिले..
पनवेल येथील नियोजित उपजिल्हा रुग्णालय कामकाजाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत 15 दिवसात कामकाज पूर्ण करण्यासाठी संबंधित आदेश दिले..