‘नगरसेविका चषक 2019’ नेहरू मैदान डोंबिवली येथे आयोजित करण्यात आला होता. उद्घाटनप्रसंगी नगरसेविका खुशबू चौधरी व खेळाडू उपस्थित होते. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला व त्यांना शुभेच्छा दिल्या.
जय मल्हार शालेय विद्यार्थी वाहक सामाजिक संस्था डोंबिवली आयोजित “आम्ही मराठी” मराठमोळ्या पोवाडा व स्फूर्तीगीत कार्यक्रम व सत्यनारायणाची पूजा संपन्न झाली. या पूजेसाठी उपस्थित सर्व मान्यवर व पदाधिकारी यांच्याशी संवाद केला.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आयोजित देशातील सर्वात मोठा कला व क्रीडा महोत्सव C.M. चषक ठाणे जिल्हास्तरीय स्पर्धा दिवा येथे आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी दिवा मंडळ अध्यक्ष आदेश भगत , प्रदेश अल्पसंख्याक महिला अध्यक्ष रिदा रशीद ,निलेश पाटील, कार्यकर्ते ,पदाधिकारी, स्पर्धक व इतर मान्यवर उपस्थित होते…
गेली कित्येक वर्षे डोंबिवलीतील कोंकणी माणसासाठी आकर्षणाचे केंद्र बनलेल्या लोकसेवा समिती आयोजित कोकण महोत्सवाचे उद्घाटन १३ जानेवारी ते २० जानेवारी दरम्यान पारंपरिक पालखी सोहळ्यासह करण्यात आले होते. याप्रसंगी महापौर विनिता राणे, नगरसेवक विशु पेडणेकर, संदिप पुराणिक, संजू बिरवाडकर, भाई देसाई, मनसे नेते राजेश कदम, लोकसेवा समिती डोंबिवलीचे अध्यक्ष बाळा परब, आत्माराम नाटेकर व इतर मान्यवर […]
आगरी कोळी प्रतिष्ठान आयोजित ‘आगरी कोळी महोत्सव २०१९’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. हा कार्यक्रम डोंबिवलीमध्ये सुरु असून यावेळी सहकाऱ्यांसमवेत या कार्यक्रमाला भेट दिली व आगरी-कोळी बांधवांशी संवाद साधला.
रामदासस्वामी संस्थान सज्जनगड, यांचे पादुकादर्शन प्रचार दौरा व भिक्षा फेरी डोंबिवली येथील बोडस मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी दर्शन घेऊन शुभ आशीर्वाद घेतले.
*उद्घाटन सोहळा* महिला व बालकल्याण समिती सभापती सौ. रेखा राजन चौधरी, कल्याण डोंबिवली महानगरपालिका, कल्याण यांच्या नवीन सभापती कार्यालयांचा उद्घाटन सोहळा कल्याण डोंबिवली महानगरपालिका, नवीन इमारत, तळमजला शंकरराव चौक, कल्याण (प.) येथे संपन्न झाला. याप्रसंगी आमदार नरेंद्र पवार, उपमहापौर उपेक्षा भोईर, नगरसेवक संदीप पुराणिक, विनोद काळण, मंदार टावरे, राजन चौधरी, संदीप सिंग, नंदूजी जोशी, वरूण […]
तीर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर मंदिर, श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ आयोजित एस.एस. सी. मार्गदर्शन व्याख्यानमालेसाठी उपस्थित सर्व मान्यवर व्याख्याते, शिक्षकवर्ग आणि सर्व विद्यार्थी मित्रांशी संवाद साधतांना…
भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न कै. अटलबिहारी बाजपेयीजी यांच्या जयंतीनिमित्त, नगरसेवक विशू पेडणेकर आयोजित भव्य चित्रकला स्पर्धा…
नगरसेवक महेश बाबुराव पाटील यांच्या वार्ड क्र. 82 मधील काँक्रीटीकरण विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी उपस्थित सर्व मान्यवर व पदाधिकारी..