श्रावण महिन्यात गेली ५२ वर्षे डोंबिवली येथील खिडकाळेश्वर मंदिरात गुजराती समाजातर्फे महादेवाचे पूजन आणि अतिशय रुचकर भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते. यंदाही त्याचा लाभ घेतला.
सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी सरकार प्रयत्नशील!
आगरी यूथ फोरम, डोंबिवली यांनी विद्यार्थी व गुणवंताचा गौरव सोहळा डोंबिवली येथे आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाकरीता मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांची माहिती दिली. प्रसंगी ज्येष्ठ नेते मा. श्री. जगन्नाथजी पाटील, श्री. रमेशजी पाटील, श्री. गुलाबाजी वझे, विद्यार्थी, पालक व इतर मान्यवर उपस्थित होते.
गोपाळकाला म्हणजे चैतन्याचा उत्सव! याच गोपाळकाला सणासाठी डोंबिवली पश्चिम येथील नवसह्याद्री गोविंदा पथकाचा दहीहंडीचा सराव आजपासून सुरू करण्यात आला. त्याप्रसंगी पूजेस उपस्थित राहून सर्व गोविंदाना सुरक्षितपणे सराव करून दहीहंडी उत्सव साजरा करण्यास शुभेच्छा दिल्या.
शिवाई बालक मंदिर ट्रस्ट आयोजित कल्याण तालुका शिवाई आंतरशालेय वर्षां मॅरेथॉन 2019 डोंबिवली येथील सावळाराम क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आली होती. प्रसंगी खेळाडू व इतर मान्यवर उपस्थित होते. गतिमंद आणि दिव्यांग मुलांचा सहभाग हे या मॅरेथॉनचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले. सर्व सहभागी स्पर्धक व आयोजक संस्था आणि पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन! मुलांना खेळांचे महत्त्व पटवून […]
पालघर जिल्हा दौऱ्या दरम्यान ट्राईन पालघर आदिवासी कलाकृती प्रदर्शनी दालन व विक्री केंद्र ए. आ. वि. प्र. जव्हारच्या उदघाटनप्रसंगी जिल्हा परिषद सीईओ मिलिंद बोरीकर, अधिकारी, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
मोखाडा तालुक्यातील विकासकाम आढावा बैठक मोखाडा पंचायत समिती आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत तालुक्यातील झालेली विकासकामे व प्रलंबित विकासकामांबाबत आढावा घेतला. शासनाच्या विविध योजनांचा लाभ जनतेला झाला पाहिजे व तालुक्यातील रस्त्यांची झालेली दुर्दशाबाबत तातडीने दुरुस्ती काम सुरू करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.
कल्याणमधील आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडची समस्या सोडविण्यासाठी एक बैठक आज मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत मुंबई येथे झाली. मंत्री योगेश सागर यावेळी उपस्थित होते. आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड न्यायालयाच्या आदेशानंतर शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्याचे प्रयोजन असल्याचे पालिका प्रशासनाकडून लेखी आणि तोंडी सांगितले जात होते तरी प्रत्यक्षात आजही शहरात तयार होणार शेकडो टन कचरा आधारवाडी डम्पिंग ग्राऊंडवरच […]
सालाबादप्रमाणे याही वर्षी हुशार व गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय उपयोगी वह्या वाटप करण्यात आल्या. आज दिवसभर अजून 6 ठिकाणी मोफत वह्या वाटप सुरु आहे. गरजूंनी या उपक्रमाचा फायदा घ्यावा… सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा !!!
‘आदर्श डोंबिवलीकर पुरस्कार सोहळा २०१९’ नुकताच संपन्न झाला. त्यासोबतच ‘डोंबिवलीकर-एक सांस्कृतिक परिवारा’च्या दशकपूर्ती विशेषांकाचे प्रकाशन सुद्धा करण्यात आले. यावेळी प्रकाशनप्रसंगी प्रमुख पाहुणे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव-सीमा देव, अध्यक्ष अडगुरू भरत दाभोडकर आणि इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.