हजार शब्दांत जे सांगता येत नाही त्यापेक्षा अधिक आशय एक समर्पक छायाचित्र सांगू शकते.. आज जागतिक छायाचित्र दिन सन १८३९ मध्ये फोटोग्राफीची सुरुवात झाली. १९ ऑगस्ट १८३९ रोजी फ्रेंच सरकारने पेटंट विकत घेतले व या आविष्काराला संपूर्ण जगात मान्यता दिली. म्हणूनच १९ ऑगस्टला जागतिक छायाचित्र दिनच्या रुपात साजरा करतात. हा दिवस त्या छायाचित्रकारांच्या कामाला प्रोत्साहित […]
केरळ राज्यातील पाऊस आणि पूरपरिस्थितीने जनतेवर अस्मानी संकट आलंय. केरळी बांधवांसाठी समस्त डोंबिवलीकर एकत्र सरसावलेत. माझ्यासह केडीएमसीतील भाजपा नगरसेवक एक महिन्याचा पगार केरळच्या सेवा भारती केरलम संस्थेला देतोय. भाजपा साऊथ इंडियन सेलही याबाबत पुढाकार घेत आहे. मी सर्वांना नम्र विनंती करू इच्छितो की आपणही सढळ हस्ते आपले योगदान द्यावे.
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ (सिडको) तर्फे ‘सर्वांसाठी घरे’ धोरणाअंतर्गत आर्थिक दुर्बल व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी‘महागृहनिर्माण योजनेत’ साकारण्यात येणाऱ्या १४ हजार ८३८ घरांच्या ऑनलाईन सोडत अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना पुढील टप्प्यात आणखी २५ हजार घरांची सोडत या वर्षाअखेरीस जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. […]