रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील जांभूळपाडा ताबाडडोह येथील नदी पुलाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, रवीशेठ पाटील, राजेंद्र राऊत, राजेश मापारा, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
पेण येथे एम.एम.आर.डी. ए.च्या माध्यमातून प्रसंगी आमदार प्रशांत ठाकूर, रविशेठ पाटील, वैकुंठ पाटील, नगरसेवक, शासनाचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील गणेशोत्सव २०१९ साठी करावयाच्या उपाययोजना तसेच कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी परिषद सभागृह,६ वा मजला, विस्तारित इमारत, मंत्रालय, मुंबई येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, पोलीस अधिक्षक रायगड जिल्हा, अनिल पारसकर, तसेच शासनाच्या सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जांभरूण येथे भारतीय जनता पक्षाचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेतला. याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.
उरण येथील भारतीय जनता पक्ष सदस्यांनी पी.पी. खारपाटील हायस्कूल चिरनेर येथे पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात चिरनेर पंचक्रोशीतील विविध पक्षांतील शेकडो कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन!
रायगड जिल्ह्यातील उरण येथील चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील चिरनेर गाव स्मशानभूमी ते खाडी, नाला खोदाई व बांध बंदीस्त या कामकाजाचे भूमिपूजन करण्यात आले. या प्रसंगी आमदार प्रशांतजी ठाकूर, आमदार मनोहर भोईर, महेशजी बालदी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे अधिकारी, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी महाड १९४, महाड विधानसभा मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाटन प्रसंगी आमदार प्रविणजी दरेकर, बिपीन महामुनकर, राजेश भोसले, जयंत दळवी, अनंत माने, इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
रायगड जिल्हा दौऱ्या दरम्यान महाड तालुक्यातील विकास काम आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत तालुक्यातील सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते तालुक्यातील सुरू असलेली विकासकामे व प्रलंबित विकासकामांबाबत माहिती घेऊन तालुक्यातील जनतेला शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता यावा बाबतचे आदेश दिले.
मुंबई महानगर प्रदेशात पालघर, ठाणे, रायगड या विभागांचा समावेश करण्याच्या ठरावाला विधानसंभेत मंजुरी!
*रिजनल प्लॅन संदर्भात बैठक* पालघर,ठाणे, रायगड प्रादेशिक आराखडा(regional plan) मधील असलेल्या त्रुटी,दोष हे पालघर जिल्ह्यातील लोकांवर अन्यायकारक आहेत. सादर केलेला प्लॅन तसाच मंजूर केला तर पालघर जिल्ह्याच्या विकासाला 20 वर्षांपर्यंत खीळ बसेल. पालघर जिल्ह्यातील आर्किटेक आणि इंजिनिअर असोसिएशन आणि जिल्ह्यातील सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी ह्या विषयावर आवाज उठवला आहे. काल दि.19 जून रोजी विकास आराखड्यावर […]