नवसाला पावणारा लालबागचा राजाच्या श्रीगणेशाचे आज परिवारासह दर्शन घेतले.
रायगड जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची समग्र माहिती पर्यटकांना उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्हा माहिती कार्यालय रायगड यांनी तयार केलेल्या ‘रायगड: पर्यटन विविधा’ या ई-बुकचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. तसेच रायगड जिल्ह्यात येणाऱ्या सर्व पर्यटकांना माहिती देणाऱ्या मोबाईल ॲपचेही उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्याने […]
किल्ले जंजिऱ्यावर आता कायमस्वरूपी राष्ट्रध्वज फडकणार.. या ऐतिहासिक कार्यक्रमात श्रीमंत छत्रपती खा. युवराज संभाजीराजे भोसले, श्रीमंत श्री. रघुजीराजे आंग्रे, श्रीमंत श्री. सत्येंद्रराजे दाभाडे सरकार, मा. आ. संजयजी केळकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं !!!
रायगड दौऱ्या दरम्यान अलिबाग येथील पोलिस मुख्यालय येथे पोलिस स्मृतिदिना निमित्त, कर्तव्य बजावत असताना शहीद झालेल्या हुतात्म्यांना मानवंदना देऊन भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली.
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त एक विशाल रॅली काढण्यात आली होती. रॅली मध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी सर्व ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी आणि सर्व नागरीक…
डोंबिवलीकरांच्या सहवासात राजकीय क्षेत्रात कार्यरत राहून आता १६ वर्षे झाली. मी स्वतःला भाग्यवान समजतो की नियतीने माझीच निवड केली तेही मला प्रिय असलेलं काम करण्याची.. जनसंपर्क.. लोकांमध्ये राहून काम करणं.. विशेषतः तरुण मुलं-मुलींशी संवाद साधत असताना त्यांचे वेगळे विचार, भन्नाट कल्पना आणि अत्यंत फ्रेश असा दृष्टिकोन पाहताना आपल्यातही एक ऊर्जा उत्पन्न होते हा स्वानुभव आहे. […]
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक केंद्राचे उद्घाटन व प्राथमिक सामंजस्य करार आदान प्रदान समारंभ येथील सह्याद्री अतिथीगृहात आज झाला. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षणमंत्री श्री गिरीष महाजन, पश्चिम ऑस्ट्रेलियाचे पर्यटनमंत्री श्री पॉल पॅपेलीया, कुलगुरू डॉ. श्री दिलीप म्हैसेकर आणि मी यावेळी उपस्थित होतो. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या या नव्या विभागाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण सुद्धा यावेळी […]