मुंबई महानगर प्रदेशात पालघर, ठाणे, रायगड या विभागांचा समावेश करण्याच्या ठरावाला विधानसंभेत मंजुरी!
‘फ्रेरिया इंडिका’ या वनस्पतीचे शिवराज्याभिषेकदिनानिमित्त ‘शिवसुमन’ असे नामकरण करण्यात आले आहे. या आगळ्यावेगळ्या उपक्रमात सहभागी होण्याची मला संधी मिळाली. या वनस्पतीचा शोध शिवनेरी किल्यावर लागला होता त्यामुळेच शिवराज्याभिषेकदिनी या फुलाचे नामकरण करण्यात आले. हे सुंदर फुल फक्त महाराष्ट्रातच आढळून येते हि बाब आपल्या महाराष्ट्राच्या जैवविविधतेची साक्ष आहे
पनवेल येथील नियोजित उपजिल्हा रुग्णालय कामकाजाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत 15 दिवसात कामकाज पूर्ण करण्यासाठी संबंधित आदेश दिले..
भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई (A) रासप महायुती २८-मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्री. मनोजजी कोटक यांचे प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेला संबोधित करतांनाची क्षणचित्रे. #BJP #Shivsena #BhaJaPa
रायगड जिल्ह्यातील भारतीय सैन्यदलातील भारत-पाक युद्धातील शहीद झालेल्या जवानाच्या वारसांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने ५ एकर जमीन मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्यात प्रथम रायगड जिल्ह्यातील जवानाच्या वारसांना जमीनेचे वाटप झाले.
जागतिक दर्ज्याच्या ‘कारंजा पोर्ट टर्मिनल’चे सह्याद्री गेस्ट हाऊस, मुंबई येथे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते ई-उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सर्व मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.
‘व्हिजन रायगड डॉट इन’ या आगळ्या वेगळ्या वेबपोर्टलचे उद्घाटन महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीसजी यांच्या हस्ते आज झाले. मा. प्रशांत ठाकूर यांच्या विविध क्षेत्रातील तज्ञ सहकाऱ्यांसोबतच्या विचारमंथनातून साकारलेले ‘व्हिजन रायगड डॉट इन’ हे केवळ वेबपोर्टल नसून भारतभूमीवर प्रथमच घडणारा ‘सोशल इनोव्हेशनचा’ एक आगळा प्रयोग आहे. डिजिटल माध्यमातून आपापल्या विभागांची माहिती संपूर्ण जगापर्यंत पोहोचवू इच्छिणाऱ्या […]
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी यात्रेत सह परिवार भराडी आईचे दर्शन घेतले. त्याप्रसंगी उपस्थित भाविकांशी संवाद सुद्धा साधला.
रायगड जिल्हा दौऱ्या दरम्यान अलिबाग येथील मेदेखार गावात आयोजित ‘कार्यकर्ता’ मेळाव्यात उपस्थित मान्यवर, पदाधिकारी व ग्रामस्थांशी सवांद साधला.
महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत माणगांव भेलीव रस्त्यावर कि.मी. १/९०० मध्ये लहान पुलाचे बांधकाम ग्रा.मा.-१० ता सुधागड, जि. रायगड या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. याप्रसंगी रविशेठ पाटील, वैकुंठ पाटील, राजेंद्र राऊत, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.