भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चा आयोजित देशातील सर्वात मोठा क्रीडा कला महोत्सव पारितोषिक वितरण सोहळा या कार्यक्रमप्रसंगी शिक्षण मंत्री, क्रीडा मंत्री विनोदजी तावडे, राजनजी तेली, प्रमोदजी जठार, अतुल काळसेकर, अतुल रावराणे, संदेश पारकर, भाई सावंत, राजू राऊळ, प्रभाकर सावंत, खेळाडू व सिंधुदुर्गवासी या भव्य कार्यक्रमासाठी उपस्थित होते..
सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्या दरम्यान मालवण तालुक्यातील हडी ग्रामसचिवालय आणि जैवविविधता माहिती केंद्र लोकार्पण सोहळा समारंभाप्रसंगी प्रमोद जठार, विजय जोशी ,अतुल काळसेकर, अतुल रावराणे, संदेश पारकर, बाबा मोंडकर, समीर घारे, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. या माहिती केंद्रामुळे पर्यटकांना कोकणच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची माहिती मिळेलच आणि त्यामुळे पर्यटकांचा ओघही वाढेल अशी खात्री वाटते.
देशातील सर्वात मोठा क्रीडा मोहत्सव CM चषक अंतर्गत भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा युवा मोर्चा आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी भाई सावंत, संदेश पारकर, अतुल काळसेकर, अतुल रावराणे,प्रभाकर सावंत, निलेश तेंडूलकर, पदाधिकारी, कार्यकर्ते व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते…..
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे ‘न्यू इंग्लिश स्कुल सिनियर कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स, सायन्स – फोंडाघाट सिंधुदुर्ग’ यांचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमात संस्थेच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी सरकारने खुशखबर दिली आहे!! मुंबई-पुणे द्रूतगती आणि कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट देण्यात आली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात पुणे व कोल्हापूरमार्गे जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना मुंबईतून जाण्यासाठी १० ते १३ सप्टेंबर तसेच त्याच वाहनांना गणेश विसर्जनानंतर परतण्यासाठी २३ सप्टेंबरपर्यंत या रस्त्यावर लागणाऱ्या टोलमधून सवलत देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही सवलत एसटी बसनाही […]
मुंबई गोवा महामार्ग पाहणी दौरा दरम्यान ज्येष्ठ नेते व महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री ना. श्री. चंद्रकांतजी दादा पाटील यांच्यासमवेत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करतांना…
उत्तर काश्मिरच्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेल्या मोठ्या कारवाईत महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना वीरमरण आलं. मीरा रोडच्या शीतल नगर येथील हिरल सागर इमारतीत राणे कुटुंब राहतं. ते मूळचे कोकणातल्या वैभववाडीचे आहेत. यंदा कौस्तुभ यांना सेना पदकाने सन्मानित करण्यात आले होते. मेजर कौस्तुभ प्रकाश राणे यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या […]
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील औरस येथील श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट, कासल च्या इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग आयोजित समारंभात उपस्थित प्राचार्य विद्यार्थी व इतर मान्यवरांशी सुसंवाद…
सिंधुदुर्ग जिल्हा दौरा औरस येथील ग्रामपंचायत विकास कामांबाबत प्रमुख पदाधिकारी व ग्रामपंचायतमधील सदस्यांसोबत बैठक घेऊन आढावा घेतला.