पालघर जिल्ह्यातील डहाणू येथील कांग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये डोंबिवली येथील जनसंपर्क कार्यालयात प्रवेश घेतला. सर्वांचे मनःपूर्वक स्वागत!
बोईसर येथे भारतीय जनता पार्टी आयोजित कार्यकर्ता संमेलन प्रसंगी कार्यकर्त्यांसह संवाद साधला. तसेच अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. सर्वांचे अभिनंदन!
आगरी समाजाचे श्रद्धास्थान असलेले बालयोगी श्री. सदानंद महाराज यांच्या आश्रम बचाव समिती आयोजित बाबांच्या भक्तांचा महामेळाव्याला आज विरार येथे भेट दिली. या मेळाव्यात न्यायालयाचा निकाल तसेच कायदा व सुव्यवस्थेचाचा आदर ठेऊन सर्वांच्या सहकार्यांनी कायदेशीररित्या लढा देऊन योग्य तो मार्ग काढु असे आवाहन उपस्थित भक्तांना केले.
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पातर्फे महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग पालघर ह्यांना भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्त्य साधून जिल्ह्यातील रुग्णांच्या सेवेसाठी अद्ययावत रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली. उपस्थित मान्यवरांसमवेत रुग्णवाहिकेचे लोकार्पण करताना.
पालघर जिल्हातील जव्हार येथील पतंगशहा कुटीर रुग्णालय येथे डॉक्टर अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीचा उद्घाटन समारंभ पार पडला. या प्रसंगी मान्यवर तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
पालघर जिल्हा दौऱ्या दरम्यान तलासरी येथे सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कार्यकर्त्यांनी करताना.
महावितरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या काही प्रलंबित कामांचा परिणाम नागरिकांना सोसावा लागत असून यामुळे शासनाबद्दलची चुकीची प्रतिभा सर्वसामान्यांमध्ये पोहोचत आहे. पालघर जिल्ह्य़ात पुरेशा प्रमाणात रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) ठेवण्यात यावेत तसेच बिघाड झाल्यास दोन दिवसांमध्ये ट्रान्सफॉर्मर बदलण्याची व्यवस्था करण्यात यावी असे निर्देश महावितरणच्या मुख्य अभियंता यांना देण्यात आले.
पालघर जिल्हा वर्धापनदिन व महसुलदिन समारंभ पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. वर्धापनदिन व महसुलदिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा!
महाराष्ट्र शासन पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद पालघर आयोजित संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१८-२०१९ आणि जिल्हा परिषद गट स्पर्धा व जिल्हास्तरीय राष्ट्रसंत तुकोडजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा चे बक्षीस वितरण समारंभ व स्वच्छ महोत्सव उदघाटन सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाला. स्वच्छता अभियानाचा प्रचार व प्रसार व्हावा स्वच्छतेचे फायदे याबाबत माहिती दिली.पुरस्कार प्राप्त करण्याऱ्या गटाचे […]
पालघर जिल्ह्याच्या नवीन प्रशाकीय इमारतीच्या बांधकामाबाबत बैठक पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी श्री कैलास शिंदे सिडकोचे अधिकारी, शासनाचे विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. इमारतीचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे व वेळेत पूर्ण होण्यासाठी आदेश दिले.