सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्या दरम्यान मालवण तालुक्यातील हडी ग्रामसचिवालय आणि जैवविविधता माहिती केंद्र लोकार्पण सोहळा समारंभाप्रसंगी प्रमोद जठार, विजय जोशी ,अतुल काळसेकर, अतुल रावराणे, संदेश पारकर, बाबा मोंडकर, समीर घारे, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. या माहिती केंद्रामुळे पर्यटकांना कोकणच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची माहिती मिळेलच आणि त्यामुळे पर्यटकांचा ओघही वाढेल अशी खात्री वाटते.
फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे ‘न्यू इंग्लिश स्कुल सिनियर कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स, सायन्स – फोंडाघाट सिंधुदुर्ग’ यांचे वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमात संस्थेच्या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, पदाधिकारी, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान मोदीजींच्या ‘डिजिटल इंडिया’मुळे प्रत्येक क्षेत्राला ऑनलाईन व्यासपीठ उपलब्ध होतंय आणि जगाची बाजारपेठ खुणावती आहे. आपल्या साखरेला ऍपच्या माध्यमातून जगाशी जोडणाऱ्या झाले. आता शेतकरी, व्यापारी व कारखानदारांना गोड बातम्या मिळो.
जयसिंगपूरच्या मालू कुटुंबीयांचा ‘लेक माझी’ हा मुलींना आर्थिक पाठबळ देणारा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे. बाबुलाल मालू हे समाज मत जाणून घेणारे व्यवसाय क्षेत्रातील व्यक्तीमत्व आहेतच, पण त्यांच्या माणूसकीचे दर्शन या उपक्रमातून संपूर्ण महाराष्ट्रास परिचित आहे.
तिरुपती तिरुमला देवस्थान (टी.टी.डी.) आणि ओम श्री साई धाम ट्रस्ट (विरार) यांच्यातर्फे ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथे ‘श्रीनिवास मंगल महोत्सव’ साजरा करण्यात आला. ‘श्रीनिवास मंगल महोत्सवा’च्या शुभप्रहरी मूर्तीपूजनाच्या आणि तोमाला सेवेच्या वेळी उपस्थित सर्व मान्यवर, भक्तगणांसोबत दर्शन घेतले…
भारतीय जनता पार्टी ‘CM चषक क्रीडा स्पर्धा व कला बक्षीस समारंभ’ CKT कॉलेज मध्ये आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी राम सेठजी ठाकूर, आमदार प्रशांतजी ठाकूर, महापौर, उपमहापौर, कार्यकर्ते व स्पर्धक उपस्थित होते.
सर्वपक्षीय युवा मोर्चा २७ गावे कल्याण-डोंबिवलीच्या वतीने उपस्थित शिष्टमंडळाने मा. महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन दिले. त्याप्रसंगी शिष्टमंडळाशी संवाद साधला…
रायगड जिल्हातील पाली खोपोली राष्ट्रीय महामार्ग बाबत व समस्यांबाबत शासकीय अधिकारी आणि पदाधिकारी यांची मुंबई येथील मंत्रालयीन दालनात बैठक घेण्यात आली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.
डोंबिवली येथे ‘सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती’चा मोर्चा काढण्यात आला. सरकारचा प्रतिनिधी म्हणून या समितीच्या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारून व जनतेशी संवाद साधला…
नेरूळ-सीवूडस दारावे/बेलापूर-खारकोपर (पहिला टप्पा) नवीन लाईन आणि पनवेल-पेण विद्युतीकरणाच्या कामाचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री श्री. पियुष गोयल यांनी उद्घाटन केले. केंद्रीय मंत्री श्री. अनंत गीते, श्री. रामदास आठवले, राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यावेळी उपस्थित होते. बेलापूर/नेरूळ-खारकोपर विभागातील ईएमयू सेवा आणि वसई रोड-दिवा-पनवेल-पेण विभागातील मेमू सेवेला व्हीडिओ लिंकच्या मदतीने यावेळी हिरवे झेंडे […]