वेंगुर्ले येथील सुसज्ज मच्छीमार्केट पायाभरणी समारंभ संपन्न झाला, यावेळी पालकमंत्री दिपक केसरकर व इतर सर्व मान्यवर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली… तसेच वेंगुर्ले नगरपरिषदेच्या श्री. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहाचे उद्घाटनही पार पडले. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, नगरविकास प्रशासन अधिकारी संतोष झिरगे, माजी आमदार पुष्पसेन सावंत, राजन तेली, मुख्याधिकारी वैभव सापळे, नगराध्यक्ष दिलीप गिराप, उपनगराध्यक्षा सौ. अस्मिता […]
अखंड भारताचे निर्माते, लोह पुरुष, भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा केला गेला. या दिवसाचे औचित्य साधून कल्याण-डोंबिवली मध्ये आयोजित ‘रन फॉर युनिटी’ या दौड मध्ये अनेकांनी सहभाग घेतला. आमदार नरेंद्रजी पवार, आमदार गणपतजी गायकवाड व इतर मान्यवर, पदाधिकारी व हजारो नागरिक या दौड मध्ये सहभागी झाले.
सुभेदार वाडा कल्याण व रोटरी क्लब कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रा. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे ‘विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध’ या व्याख्यानास उपस्थित सर्व मान्यवर मंडळी व जनसमुदाय यांच्यासोबत संवाद साधला व कार्यक्रमात सहभाग घेतला…
रायगड जिल्हातील रोहा येथील ‘धावीर महाराज पालखी सोहळा’ संपन्न झाला… या पालखीदरम्यान सर्व भाविकांसमवेत दर्शन घेतले…
मुंबई येथे आयोजित ‘नॅशनल रबर कॉन्फरन्स’साठी उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी, प्रतिनिधींशी संवाद…
यंदाचा ‘राज्य शिक्षक पुरस्कार’ जाहीर करण्यात आला असून यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर व रायगडचे शिक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत. पुरस्कार जाहीर झालेल्या सर्व शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन!
खुल्या प्रवर्गासह इतर मागासवर्ग/ विमुक्त जाती/ भटक्या जमाती/ विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनाही आता परदेशातील मिळणार.
डोंबिवलीसाठी अभिमानाचा क्षण ! आंतरराष्ट्रीय ब्रिजपटू व भारतीय संघाचे प्रशिक्षक, डोंबिवलीकर श्री. आनंद सामंत यांचा आज 3 वाजता ब्राह्मण सभा डोंबिबली येथे समस्त डोंबिवलीकर परिवार डोंबिबली ब्रीज असोशिएशन परिवार व समस्त भाजपा परिवार या सर्वांच्या वतीने गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी डोंबिवली आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावेत म्हणून लवकरच भारतीय जनता पार्टी च्या […]
गृहनिर्माण क्षेत्राला शिस्त लागावी म्हणून अस्तित्वात असलेल्या रेरा कायद्याची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्र अव्वल स्थानी असून राज्यात या अंमलबजावणीचे प्रमाण ९०% आहे..
‘कमल संदेश’ हे भाजपचे अधिकृत ई-मासिक (पाक्षिक) आहे जे दर १५ दिवसात प्रकाशित होते. १ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट २०१८ पर्यंतचे भाजपचे नवनवीन संघटनात्मक कार्य, वैचारिक साहित्य, संपादकीय, मोदी सरकारचे नवनवे कार्यक्रम व सफलता अशा अनेक विषयासंबंधी जाणून घेण्यासाठी ‘कमल संदेश’ नक्की वाचा. हे वाचण्यासाठी पुढील संकेतस्थळावर जा: कमल संदेश