गुरुनानक जयंतीनिमित्त उल्हासनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेत सर्व शीख बांधवांसमवेत सहभाग घेतला व दर्शन केले.
सर्वपक्षीय युवा मोर्चा २७ गावे कल्याण-डोंबिवलीच्या वतीने उपस्थित शिष्टमंडळाने मा. महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांना निवेदन दिले. त्याप्रसंगी शिष्टमंडळाशी संवाद साधला…
रशियात मॉस्को येथे १६ ते १९ नोव्हेंबर २०१८ मध्ये झालेल्या आंतराष्ट्रीय एरोबिक्स चॅम्पियनशिप्स स्पर्धेत आपल्या डोंबिवलीतील अमेय शिंदे याने ‘सुवर्ण’ तर ईश्वरी मिलिंद शिरोडकर हिने ‘रौप्य’ पदक पटकावले. तसेच या जोडीने डबल्समध्ये ही सुवर्ण पदक पटकावले. समस्त डोंबिवलीकरांतर्फे दोघांचे, त्यांच्या शिक्षकांचे आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
डोंबिवली येथे ‘सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती’चा मोर्चा काढण्यात आला. सरकारचा प्रतिनिधी म्हणून या समितीच्या विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारून व जनतेशी संवाद साधला…
भारतीय जनता पार्टी उल्हासनगर येथे भव्य पक्ष प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उपस्थित अनेक मान्यवर, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मोठ्या संख्येने अनेकांनी पक्षात प्रवेश केला.
अखंड भारताचे निर्माते, लोह पुरुष, भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा केला गेला. या दिवसाचे औचित्य साधून कल्याण-डोंबिवली मध्ये आयोजित ‘रन फॉर युनिटी’ या दौड मध्ये अनेकांनी सहभाग घेतला. आमदार नरेंद्रजी पवार, आमदार गणपतजी गायकवाड व इतर मान्यवर, पदाधिकारी व हजारो नागरिक या दौड मध्ये सहभागी झाले.
सुभेदार वाडा कल्याण व रोटरी क्लब कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रा. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचे ‘विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध’ या व्याख्यानास उपस्थित सर्व मान्यवर मंडळी व जनसमुदाय यांच्यासोबत संवाद साधला व कार्यक्रमात सहभाग घेतला…
साईनगर मित्र मंडळ डोंबिवली पश्चिम आयोजित साई भंडारा, होमहवन दरम्यान उपस्थित सर्व भाविक आणि मित्रमंडळी समवेत…
डोंबिवली पश्चिम ठाकूरवाडी वार्ड क्र. 54 मधील अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश घेतला. याप्रसंगी उपस्थित सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्याशी संवाद ! सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
आराधना फाईन आर्ट अकादमीची संचालिका सौ. स्मिता मोरे यांची ‘आराधना’ ही संस्था डोंबिवली (प.) येथे गेली २३ वर्षे शास्त्रीय कथ्थक नृत्याच्या प्रशिक्षणासाठी सतत कार्यरत आहे. विविध उपक्रम आमच्या संस्थेतर्फे सातत्याने सुरू असतात. असाच एक नवीन उपक्रम डोंबिवलीमध्ये आराधना अकादमीतर्फे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे हे पहिले वर्ष आहे. विविध शास्त्रीय नृत्य शैलींवर आधारित *रेवाई नृत्य […]