भारतीय जनता पार्टी – डोंबिवली (पश्चिम) येथे आयोजित करण्यात आलेल्या C.M.चषक क्रीडा स्पर्धेमार्फत भागशाळा मैदान येथे ‘सौभाग्य खोखो स्पर्धे’चे उद्घाटन करण्यात आले होते. याप्रसंगी नगरसेविका विद्या म्हात्रे, राजेश म्हात्रे, प्रज्ञेश प्रभूघाटे, समीर चिटणीस, पवन पाटील, चौधरी सर, शिवाजी आव्हाड, पदाधिकारी, खेळाडू इतर मान्यवर उपस्थित होते. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी- कल्याण ग्रामीण, मार्फत आयोजन करण्यात आलेल्या […]
९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मा. अध्यक्षा अरुणाजी ढेरे यांना मसाप, डोंबिवली आणि समस्त ‘डोंबिवलीकर’ परिवारातर्फे ‘सन्मानपत्र’ प्रदान करण्यात आले. याप्रसंगी डोंबिवलीतील साहित्यिक क्षेत्रातील सर्व ज्येष्ठ मान्यवर श्री. आबासाहेब पटवारी, श्री. वामनराव देशपांडे, श्री. सुधीरभाऊ जोगळेकर, श्री. सुरेश देशपांडे, श्री. प्रल्हाद देशपांडे आणि साहित्यरसिक उपस्थित होते. अरुणाजी ढेरे यांचे पुनःश्च अभिनंदन व शुभेच्छा!!!
डोंबिवली येथील नेहरू मैदान येथे ‘आयप्पा स्वामी पूजा’ आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक भाविकांनी व मान्यवरांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार वाहून अभिवादन केले.
‘कच्छ युवक संघ, डोंबिवली’ तर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आयोजित रक्तदान शिबिरात मान्यवरांसोबत संवाद साधला गेला.
तिरुपती तिरुमला देवस्थान (टी.टी.डी.) आणि ओम श्री साई धाम ट्रस्ट (विरार) आयोजित केलेला ‘श्रीनिवास मंगल महोत्सव’ हा ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथे संपन्न झाला. श्रीनिवास मंगल महोत्सवात पूजेच्या वेळी अनेक मान्यवर आणि भक्तवर्गाची गर्दी जमली होती.
आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ‘CM चषक’ या देशातील सर्वात मोठा क्रीडा व कला मोहत्सवाचे आयोजन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात होत आहे. डोंबिवली मधील नेहरु मैदान येथे ‘शेतकरी सन्मान कब्बडी’ स्पर्धेने या चषकाचा शुभारंभ करण्यात आला. विविध शाळा, महाविद्यालय तसेच क्रीडा मंडळातुन हजारो स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घेतला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यमंत्री ना. श्री. रविंद्रजी […]
तिरुपती तिरुमला देवस्थान (टी.टी.डी.) आणि ओम श्री साई धाम ट्रस्ट (विरार) यांच्यातर्फे ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथे ‘श्रीनिवास मंगल महोत्सव’ साजरा करण्यात आला. ‘श्रीनिवास मंगल महोत्सवा’च्या शुभप्रहरी मूर्तीपूजनाच्या आणि तोमाला सेवेच्या वेळी उपस्थित सर्व मान्यवर, भक्तगणांसोबत दर्शन घेतले…
खंबाळपाडा येथे स्वर्गीय शिवाजी दादा शेलार क्रीडांगणावर ‘शिवाजीदादा शेलार चषक’ सामन्याचे उदघाट्न करण्यात आले. याठिकाणी चार दिवसीय ओव्हरआर्म क्रिकेटचे सामने रंगले. यावेळी स्थानिक नगरसेवक साई शेलार, शिल्पा वहिनी शेलार तसेच राजू शेख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी ठाणे आयोजित ‘CM चषक’ क्रीडा स्पर्धा चे KBP डिग्री कॉलेज वागळे इस्टेट – ठाणे येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्घाटन प्रसंगी आमदार संजयजी केळकर, संदीप लेले, सचिन मोरे, कार्यकर्ते, पदाधिकारी व स्पर्धक उपस्थित होते.